Advertisement

राणीची बाग आता ऑनलाईन, 'अशी' करा व्हच्र्युअल सफर

मुंबईची ओळख असलेली राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आता ऑनलाईन भेटीला आलं आहे.

राणीची बाग आता ऑनलाईन, 'अशी' करा व्हच्र्युअल सफर
SHARES

मुंबईची ओळख असलेली राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आता ऑनलाईन भेटीला आलं आहे. प्राणिसंग्रहालयाच्या वतीनं या विशेष माहितीपटांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘द मुंबई झू’ या यूटय़ूब वाहिनीद्वारे नागरिकांना या सफरीत सामील होता येणार आहे.

‘व्हच्र्युअली वाइल्ड: द व्हच्र्युअल टूर ऑफ राणी बाग’ असं या मालिकेचं नाव आहे. या माध्यमातून राणी बागेचा १६० हून अधिक वर्षांचा इतिहास, काही महत्त्वाचे प्रसंग, किस्से, आठवणी जगासमोर येणार आहेत. या मालिकेचा पहिला भाग ‘राणी बागेचा इतिहास’ हा स्वातंत्र्यदिनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.

सध्या प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात राणी बागेची निर्मिती, इतिहास आणि आजवर लोकांसमोर न उलगडलेल्या गोष्टी मांडल्या आहेत. तर आगामी भागातून तेथील प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडे यांची माहिती, त्यांचा बागेपर्यंतचा प्रवास, त्यांच्या प्रजातींची माहिती, बागेत घडणारे काही गमतीशीर किस्से नेटकऱ्यांच्या भेटीला येणार आहेत.

ऐतिहासिक वारसा जपणारी राणी बाग, पर्यटन क्षेत्रातील त्या वस्तूचे महत्त्व, आंतरराष्ट्रीय दर्जाची कार्यपद्धती, येथील नैसर्गिक संपत्ती, जैवविविधता यांची माहिती लोकांना घरबसल्या मिळावी. लोकांच्या मनात निसर्गाप्रति सद्भावना निर्माण व्हावी या उद्देशानं माहितीपट मालिका बनवण्यात आली आहे.

दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे राबवल्या जाणाऱ्या प्राणी दत्तक योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्राण्यांच्या संख्येपेक्षा इच्छुक प्राणीपालकांची संख्या जास्त असल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रीय उद्यानात ५ वाघ, १३ बिबटे आणि २ सिंह आहेत. त्यांच्यासाठी अनुक्रमे ७, १४ आणि ३ अर्ज आले आहेत. यापैकी ८ बिबटे आणि २ वाघ काही महिन्यांपूर्वीच दत्तक घेतले गेले आहेत. ३ वाघाटींसाठी (रस्टी स्पॉटेड कॅ ट) ५ अर्ज आले आहेत. ३ नीलगाय, ९ भेकर (बार्किं ग डिअर) आणि ३५ हरिणे या सर्वांसाठीही अर्ज आले आहेत.

वाघ आणि सिंह गेल्या २ वर्षांपासून दत्तकत्वाच्या प्रतीक्षेत होते. प्राणी दत्तक घेणाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रमाणपत्र दिले जाते आणि ते प्राण्याच्या पिंजऱ्यावरही लावले जाते. दर १५ दिवसांनी संबंधित प्राण्याला काही अंतरावरून पाहण्याची संधी त्याच्या आर्थिक पालकांना दिली जाते.



हेही वाचा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्राणी दत्तक योजनेला उत्सुर्त प्रतिसाद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा