Advertisement

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणारे आदिवासी आक्रमक, 'या'साठी केली निदर्शनं

आदिवासींनी 'या' मागणीसाठी दहिसरमध्ये धरणे आंदोलन केले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणारे आदिवासी आक्रमक, 'या'साठी केली निदर्शनं
SHARES

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भागात राहणाऱ्या आदिवासींनी वीज आणि पाण्यासाठी लढा सुरू केला आहे. आदिवासींचं म्हणणं आहे की, ते गेल्या अनेक वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात वास्तव्यास आहेत. पण वीज आणि पाणीपुरवठा नसल्यानं त्यांचं जगणं कठीण झालं आहे. आदिवासींनी या मागणीसाठी दहिसरमध्ये धरणे आंदोलन केले.

हा निषेध बिरसा मुंडा आदिवासी कामगार संघटनेने आयोजित केला होता. आदिवासी कामगार संघटनेची मागणी आहे की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींना व्हिडीओच्या माध्यमातून वीज आणि पाणीपुरवठा करण्यात यावा आणि यासह रोजगाराचे महत्त्व स्थानिक लोकांनाही द्यावे.

स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनीही आदिवासींची भेट घेतली आणि त्यांच्या निराकरणासाठी त्यांच्याची बातचित केली. खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, "आदिवासींसाठी वसाहत ठरवण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे आणि सरकार लवकरच यावर विचार करेल."Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा