कयार चक्रीवादळ मुंबईपासून दूर, पण...

अरबी समुद्रात निर्माण झालेलं कयार या वादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात झालं आहे. हे वादळ पश्चिम किनारपट्टीपासून पुढे सरकलं आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून हे वादळ ८३० किलोमीटर दूर आहे आणि ते ओमानच्या दिशेनं पुढे सरकत आहे. तरीही पुढचे काही दिवस ढगांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

...म्हणून चक्रीवादळ आलं

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचं रूपांतर शुक्रवारी चक्रीवादळात झालं होतं. त्यानंतर शनिवारी या वादळानं अतितीव्र स्वरूप धारण केल्यानंतर रविवारी त्याचं रूपांतर महाचक्रीवादळात झालं. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अशी आठ महाचक्रीवादळे हिंदी महासागराच्या उत्तरेस तयार झाली. कयार हे नववे महाचक्रीवादळ आहे.

पावसाचा इशारा

कयार चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधल्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच येत्या चार दिवसात पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.


हेही वाचा

शाब्बास मुंबईकरांनो, दिवाळीतही वायू प्रदूषण ‘नाॅर्मल’

६९ वर्षांचे आजोबा 'असा' देतायेत फटाके न फोडण्याचा संदेश

पुढील बातमी
इतर बातम्या