Advertisement

६९ वर्षांचे आजोबा 'असा' देतायेत फटाके न फोडण्याचा संदेश


६९ वर्षांचे आजोबा 'असा' देतायेत फटाके न फोडण्याचा संदेश
SHARES

दिवाळी म्हणजे रोषणाई, उल्हास, उत्सवाचा सण आहे. प्रत्येकजण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तसेच दिवाळीत लहान मुलं फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. मात्र या फटाक्यांमुळे वायु प्रदुषणात वाढ होते. दिवाळीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारनं आणि सर्वोच्च न्यायालयानं फटाके फोडण्यास मनाई केली आहे. पण तरीही दिवाळीत फटाके फोडले जातात. अशानांच समजवण्यासाठी एका गृहस्थानं पुढाकार घेतला आहे. फटाके फोडू नयेत याचा प्रचार तो एका वेगळ्याच पद्धतीनं करत आहे.

अनोखी समाजसेवा

६९ वर्षांचे रमेश डोंगरे २०१० साली टाटा इस्टिट्यूटमधून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. तेव्हा त्यांनी सामाजिक संदेश लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आयडियाची कल्पना केली. २०१० सालापासूनच ते गळ्यात फलक घालून संध्याकाळी एक तास कांदिवली स्टेशनवर उभे राहतात. गळ्यात अडकवलेल्या फलकाच्या मदतीनं ते वेगवेगळे सामाजिक संदेश देतात. तंबाकू खाऊ नका, धुम्रपान करू नका, कटरा टाकू नका, फटाके फोडू नका असे संदेश ते देतात

"कृपया फटाके फोडू नका"

फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. सर्वांनाच याचा त्रास होतो. पण सर्वात जास्त लहान मुलांना, गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होतो. यासोबतच ध्वनी प्रदूषण देखील होतं. आवाजाचा स्तर  १५ डेसिबलहून अधिक वाढतो. फटाख्यातून कार्बन मोनाआॅक्साइड, सल्फ्यूरिक नाइट्रिक आणि कार्बनिक अॅसिडसारखे धोकादायक रसायनं बाहेर पडतात. त्यामुळे मी दरवर्षी दिवाळीत फटाके न फोडण्याचा संदेश देतो.

रमेश डोंगरे

पालकांनी घ्यावा पुढाकार

खरंच रमेश डोंगरे यांनी प्रदूषण रोखण्यासाठी एक चांगला प्रयत्न केला आहे. रमेश डोंगरे यांच्यासारखी भूमिका जर प्रत्येक पालकांनी घेतली आणि मुलांना फटाके फोडण्याचे दुष्परिणाम समजवून सांगितले तर प्रदूषण रोखण्यास हातभार लागेल.




हेही वाचा -

'अशी' आहे मुंबईतील ऑक्सीजन देणारी रिक्षा!

दिवाळीत घरच्या घरी बनवा अशा पणत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा