Advertisement

दिवाळीत घरच्या घरी बनवा अशा पणत्या

यावर्षी दिव्यांना आपल्याच पद्धतीनं सजवायाची आयडिया काही वाईट नाही. तुम्हाला खास दिव्यांची आरास करायची असेल तर घरच्याच घरी तुम्ही पणतीचे रंगकाम करु शकता.

दिवाळीत घरच्या घरी बनवा अशा पणत्या
SHARES

२७ तारखेपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. त्यामुळे आता सर्वांची तयारी जोरदार सुरू असेल. दिवाळीत आकाश कंदील आणि रांगोळी ही घराची शान असते. पण अंधाराला दूर सारत प्रकाश पसरवणाऱ्या दिव्यांना कसं विसरून चालेल. यावर्षी दिव्यांमध्ये काही तरी वेगळं हवं, याकडे प्रत्येकाचाच कल असतो.

मग यावर्षी दिव्यांना आपल्याच पद्धतीनं सजवायची आयडिया काही वाईट नाही. तुम्हाला खास दिव्यांची आरास करायची असेल तर घरच्या घरी तुम्ही पणतीचे रंगकाम करु शकता. त्यासाठी फार काही झंझट करावी लागणार नाही. आम्ही तुम्हाला कसं करायचं हे नेमकं सांगणार आहोत.


) पणत्यांना रंग देण्यापूर्वी त्या २-३ तास पाण्यात भिजवत ठेवाव्यात. पाण्यातून काढल्यानंतर १-२ तास त्या कोरड्या ठेवाव्यात. यामुळे तुम्ही अधिक चांगल्यारीत्या रंग देऊ शकता.

) पणतीला रंग देण्यासाठी फॅबरीक कलर्सचा वापर करावा. कोणत्या कंपनीचा फॅबरीक कलर तुम्ही वापरता हे देखील महत्त्वाचं आहे. फेविक्री फॅबरीक कलर्स, कॅमलिन फॅबरेलिक कलर्स यापैकी एका ब्रँडचा वापर तुम्ही करू शकता.

) जर तुम्हाला पणत्यांवर सुंदरशी डिझाइन साकारायची असेल तर बाजारात प्लेन पणत्या मिळतात त्या तुम्ही खरेदी करू शकता. त्यावर तुम्हाला पाहिजे ते डिझाइन काढता येईल.

) तुम्हाला डिझाईन नसेल काढायची तर सरळ बाजारात डिझाईनच्या पणत्या उपलब्ध असतात. त्या पणत्या खरेदी करून त्याला तुम्ही स्वत:च्या पद्धतीनं रंगवा.

) पणतीला रंगाचा डबल कोट द्या. यामुळे पणत्यांमधील भेगा पूहेही वाचार्णपणे कव्हर होऊन जातील.

) पणतीच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला एकच रंग देण्यापेक्षा वेगवेगळे रंग देऊ शकता. आतल्या बाजूला लाल आणि बाहेरच्या बाजूला नारंगी अशी रंगवलेली पणती चांगली उठून दिसते.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा