Advertisement

अशी आहे मुंबईतील ऑक्सीजन देणारी रिक्षा!

एकिकडे आरेत झाडांची कत्तल केली गेली... तर दुसरीकडे एक अवलिया झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी झटत आहे... आणि यात साथ दिली आहे ती त्यांच्या रिक्षानं. मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी ही रिक्षा साधी-सुधी नाही तर ती आहे 'वृक्ष राणी'...

अशी आहे मुंबईतील ऑक्सीजन देणारी रिक्षा!
SHARES

आजवर तुम्ही मोजक्या पण हटके रिक्षा पाहिल्या असतीलच. अगदी त्यातून प्रवास देखील केला असेल. वायफाय, टीव्ही, न्यूजपेपर अशा वेगवेगळ्या हटके सुविधा असलेल्या रिक्षा तुम्ही बघितल्या असतील.  पण तुम्ही कधी ऐकली आहे का गार्डन रिक्षा? गार्डन रिक्षा हा काय प्रकार आहे? रिक्षात कसं काय गार्डन घेऊन फिरणार? असेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण दहिसरच्या प्रकाश माने या रिक्षाचालकानं १० ते १२ रोपटी आपल्या रिक्षात लावली आहेत. मग आता याला गार्डनच म्हणार ना राव!

वृक्षराणी

प्रकाश माने हे गेली ७ ते ८ महिने रिक्षाचालक म्हणून काम करतात. काही तरी वेगळं म्हणून हल्ली रिक्षा वेगवेगळ्या पद्धतीनं सजवली जाते. प्रकाश माने यांना देखील त्यांची रिक्षा हटके पद्धतीनं सजवायची होती. वेगळेपणा जपताना त्यांना पर्यावरणासाठी देखील काही तरी करायचं होतं. त्यामुळे त्यांनी रिक्षातच वेगवेगळी रोपं लावण्यास सुरुवात केली. त्यांच्या या संकल्पनेतूनच ही रिक्षा साकारण्यात आली. या रिक्षाला त्यांनी वृक्षराणी हे नाव जरी दिलं असलं तरी प्रवासी मात्र गार्डन रिक्षा, ऑक्सीजन देणारी रिक्षा अशा नावानंच ओळखतात.

झाडे लावा झाडे जगवा

एकिकडे आरेत झाडांची कत्तल केली गेली. प्रकाश माने मात्र झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी झटत आहेत. त्यांनी फक्त रिक्षांमध्ये रोपं लावली असं नाही. तर रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांना आणि इतर रिक्षाचालकांना आयुष्यात दोन वृक्ष लावण्याचा सल्ला देतात.  

कुठेही उभी राहिली की लक्ष वेधून घेणाऱ्या या रिक्षाचा प्रवास करण्यास तुम्ही उत्सुक आहात का? असाल तर चला मुंबई लाइव्हसोबत या रिक्षातून प्रवासाला...



हेही वाचा

चिमुकल्यांच्या पोटाची आग शमवणारे 'अन्नदाता'

मुंबईतील या ५ संस्थांना करा अन्नदान आणि व्हा चांगल्या कामाचे भागीदार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा