Advertisement

वर्ल्ड हंगर डे : मुंबईतील या ५ संस्थांना करा अन्नदान आणि व्हा चांगल्या कामाचे भागीदार

घरी आयोजित पार्टी, लग्नामधील जेवण किंवा भंडारा दरम्यान प्रमाणापेक्षा जास्तीचं जेवण मुंबईतल्या अनेक स्वयंसेवी संघटनांना देऊ शकता. या संस्था उरलेलं अन्न गरीब, भूकेलेल्यांना दान करायला मदत करतात.

वर्ल्ड हंगर डे : मुंबईतील या ५ संस्थांना करा अन्नदान आणि व्हा चांगल्या कामाचे भागीदार
SHARES

अन्न हे पूर्णब्रम्ह असं भारतीय संस्कृतीमध्ये मानलं जातं. पण बहुतांशवेळी आपल्याकडे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये, लग्न समारंभात, पार्ट्यांमध्ये किंवा इतर कुठल्या कार्यक्रमात अन्नाची नासाडी होतेच कशी? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अन्न वाया घालवताना कुणालाच काही वाटत नाही. दुसरीकडे मात्र अगदी उलटी परिस्थिती आहे. आजही भारतात अनेकांच्या एक वेळच्या जेवणाचे वांदे आहेत. अनेक जण छोट्या - मोठ्या नोकरी करून देखील पोटभर जेऊ शकत नाहीत. असं असलं तरी आपण अन्न वाया घालवतो.

पण तुमच्या एका निर्णयामुळे ही परिस्थिती बदलू शकते. यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. ती म्हणजे तुम्ही घरी आयोजित पार्टी, लग्नामधील जेवण किंवा भंडारा दरम्यान प्रमाणापेक्षा जास्तीचं जेवण मुंबईतल्या अनेक स्वयंसेवी संघटनांना देऊ शकता. या संस्था उरलेलं अन्न गरीब, भूकेलेल्यांना दान करायला मदत करतात.


) फाईट हंगर फाऊंडेशन

फाइट हंगर फाऊंडेशन मुंबईसह राजस्थान, मध्य प्रदेशमधील कुपोषित मुलांना अन्नपुरवठा करते. २०१२ मध्ये सुरू झालेल्या प्रा. एम. स्वामीनाथन फाऊंडेशनचे अध्यक्ष एमरीटस इथलं काम पाहतात. फाऊंडेशनचे सदस्य कुपोषित मुलांना फक्त अन्न पुरवठाच नाही करत तर त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेतात

कसे कराल दान?

०२२२६१११२७५

अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा 


) रोटी बॅंक

मुंबईच्या डबेवाल्यांनी उरलेलं अन्न फेकण्याऐवजी त्यांच्याकडे गोळा करून गरीबांमध्ये वाटप करण्यासाठी रोटी बँक हा उपक्रम सुरू केला. यामध्ये पार्टी, सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रम ते घरातील उरलेलं अन्न देखील गोळा करण्यासाठी मदत केली जाते.


कसे कराल दान?

९८६७२२१३१० / ८६५२७६०५४२


) रॉबिन हूड आर्मी

मुंबईसह देशभरात रॉबिन हूड आर्मी या संघटनेचे कार्यकर्ते काम करतात. अगदी घरात होणाऱ्या पार्ट्यांपासून ते रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांपर्यंत उरलेलं अन्न फेकून देण्याऐवजी त्याचं वाटप केलं जातं. देशभरात सुमारे ८००० हून अधिक स्वयंसेवक यामध्ये काम करतात.


कसे कराल दान?

अधिक माहितीसाठी क्लिक करा.


) फीडिंग इंडिया

वाया जाणारे अन्न गरजूंपर्यंत पोडोचवण्याचं काम फीडिंग इंडिया करते. देशभरातील ३२ शहरांमध्ये २ हजाराहून अधिक कार्यकर्ते फीडिंग इंडियासाठी काम करतात. लग्न, हॉटेल्समध्ये उरलेलं जेवण फेकण्याऐवजी ते अन्न गरजूंना पुरवलं जातं.


कसं कराल दान?

अधिक माहितीसाठी क्लिक करा.

५) विई कॅन विई विई व्हील

पंकज ठक्कर या तरूणानं २०१६ मध्ये ही संस्था सुरू केली. जवळपास ३०० विद्यार्थ्यांना, मेट्रोसाठी काम करणारे कामगार, सरकारी हॉस्पीटलमधल्या रुग्णांचे नातेवाईक यांना ते अन्नपुरवठा करतात. आठवड्यात ८०० जणांना अन्नपुरवठा केला जातो. या संस्थेत ७०स्वयंसेवक आहेत आणि हे सर्व १५-३० या वयोगटातील आहेत. 


कसे कराल दान?

अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा



हेही वाचा

स्कायवॉकवरील 'अनोखी' शाळा, रस्त्यावरील मुलांची बनली 'ती' शिक्षिका

रेल्वेमध्ये छेडछाड काढणाऱ्या टपोरींचा कर्दनकाळ!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा