Advertisement

स्कायवॉकवरील 'अनोखी' शाळा, रस्त्यावरील मुलांची बनली 'ती' शिक्षिका

भीक मागणारी मुलं ही भीक मागून किंवा चोऱ्या करून पैसे कमवतात आणि नको त्या व्यसनांच्या आहारी जातात, भीक मागणाऱ्या मुलांबद्दल हा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन असतो. पण मुंबईतल्या एका तरूणीनं मात्र या मुलांच्यात जे पाहिलं ते कुणालाच दिसलं नाही.

SHARES

भीक मागणारी मुलं दिसली की आपण त्यांच्या हातावर एक-दोन रुपये टेकवतो किंवा त्यांना हा़डतुड करून पळवून लावतो. पण मुंबईतल्या एका तरूणीनं मात्र या मुलांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे. कांदिवलीला राहणारी २२ वर्षीय हेमंती सेन रस्त्यावर राहणाऱ्या आणि भीक मागून गुजराण करणाऱ्या मुलांना शिक्षण देत आहे. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? शिकवते त्याचे ती पैसे घेत असेल वगैरे वगैरे. असाच काहीचा तुमचा समज असेल. पण नाही हा तुमचा हा समज चुकीचा आहे. ती या मुलांना विनामूल्य शिक्षणाचे धडे देत आहे.

 


मुलांना मिळाला शाळेत प्रवेश

२०१८ साली हेमंती या मुलांच्या संपर्कात आली. त्यानंतर तिचं एकच लक्ष्य होतं ते म्हणजे शिक्षण हक्काअंतर्गत या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून द्यायचा. इथूनच हेमंतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. यासाठी तिनं जुनून नावाची संस्था स्थापन केलीहेमंती २०१८ पासून मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. स्कायवॉकवरच या मुलांची शाळा भरते. १५ मुलं या शाळेत शिक्षण घेतात. हिंदी, मराठी बाराखडी, नृत्यकला, चित्रकला अशा अनेक गोष्टींचं ज्ञान मुलांना इथून मिळत आहे. हेमंती आणि तिच्या टीमनं पाहिलेलं स्वप्न एका वर्षानंतर पूर्ण झालं आहे. आज तिच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांपैकी ६ मुलांना पालिकेच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे.


मी कामावर जाताना या मुलांना भीक मागताना पहायचे. मला त्यांच्या भविष्याची काळजी वाटायची. ही मुलं कशी जगतात? शाळेत तरी जातात का? शिक्षण काय आहे हे तरी त्यांना माहिते असेल का? असे अनेक प्रश्न मला पडले. एके दिवशी मी त्यांना भेटण्याचा निश्चय केला.

हेमंती सेन, संस्थापक, जुनून



शिक्षणासाठी खडतर प्रवास

कांदिवली स्टेशनवर हेमंतीनं या मुलांना गाठलं आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल विचारलं. पण मुलं काही सांगायलाच तयार नव्हती. पण खूप प्रयत्न केल्यानंतर ते आई-वडिलांशी भेट घालून देण्यास तयार झाले. हेमंतीनं मुलांच्या आई-वडिलांना शिक्षणाबद्दल विचारलं. पण आई-वडिलांनी त्यात काही रुची दाखवली नाही. त्यानंतर हेमंतीनं आई-वडिलांना एवढंच सांगितलं की, मी या मुलांना रोज दुपारी ३ वाजता येऊन शिकवत जाईन. आई-वडील तयार तर झाले. पण पुढचा प्रवास हेमंतीसाठी सोपा नव्हता.


शाळेत प्रवेश मिळणं कठीण

मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी मी अनेक शाळांमध्ये फिरली. शाळा मुलांना प्रवेश द्यायला तयार होती. पण मुलं नियमित शाळेत येतील का? असा प्रश्न प्रत्येक शाळेत विचारला जायचा. पण मला देखील याची खात्री नव्हती. अखेर मी या मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करण्याचा निश्चय केला.

- हेमंती सेन


मुलांसाठी स्पेशल टाईमटेबल

ऑक्टोबर २०१८ पर्यंत हेमंती मुलांना एक दिवसाआड शिकवायला यायची. पण नोव्हेंबरपासून रोज ती मुलांना शिकवायची. या मुलांसाठी स्पेशल टाईमटेबल आखण्यात आलं. यात शनिवार आणि रविवार हे दोन दिवस नृत्यकला, क्राफ्ट आणि आर्ट आदींचे क्लास होतात. तर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस बाराखडी, कविता आणि बाकी अभ्यास घेतला जातो. बुधवारी नुक्कड नाटक आयोजित केलं जातं.


मुलांमध्ये सकारात्मक बदल

हेमंतीनं सांगितलं की, मुलांच्यामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले आहेत. हल्ली मुलं भीक नाही मागत. तर छोट्या-मोठ्या गोष्टी विकून गुजराण करताना दिसतात. त्यामुळे एकप्रकारे हेमंतीनं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. तिला अशाच आणखी मुलांपर्यंत पोहोचायचं आहे ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत.


आर्थिक अडचणींचा डोंगर

हेमंतीला या सर्वांसाठी महिन्याला २०-३० हजारांचा खर्च येतो. हेमंतीचं सामाजिक कार्य समजल्यावर अनेक मुंबईकर तिच्या मदतीला येतात. अनेक जण तिला आर्थिक मदत करतात. तुम्हाला देखील तिला मदत करायची असेल तर haimanti@junoon.org.in तिच्याशी या आयडीवर संपर्क साधू शकता. याशिवाय haimantisen@obc वर UPI पेमेंट करू शकता.



हेही वाचा -

रेल्वेमध्ये छेडछाड काढणाऱ्या टपोरींचा कर्दनकाळ!

पाण्याखाली रुबिक क्यूब सोडवून चिन्मय प्रभूची गिनीज बुकमध्ये झेप




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा