Advertisement

पाण्याखाली रुबिक क्यूब सोडवून चिन्मय प्रभूची गिनीज बुकमध्ये झेप

मुंबईतल्या चिन्मय प्रभूनं चक्क १ मिनिटं ४८ सेकंद पाण्याखाली राहून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. तो फक्त पाण्याखाली राहिला नाही तर त्यानं पाण्यात राहून ९ पिरॅमिन्स (पिरॅमिडच्या आकाराचे रुबिकचे क्यूब) सोडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव झळकवलं.

पाण्याखाली रुबिक क्यूब सोडवून चिन्मय प्रभूची गिनीज बुकमध्ये झेप
SHARES

पाण्यात आपण जास्तीत जास्त किती वेळ राहू शकतो. जास्तीत जास्त ३० सेकंद तेही जर पोहता येत असेल तर. पण मुंबईतल्या चिन्मय प्रभूनं चक्क १ मिनिटं ४८ सेकंद पाण्याखाली राहून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. तो फक्त पाण्याखाली राहिला नाही तर त्यानं पाण्यात राहून ९ पिरॅमिन्स (पिरॅमिडच्या आकाराचे रुबिकचे क्यूब) सोडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव झळकावलं


कठोर मेहनतीचं फळ

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे माझ्या क्युबिंग प्रवासाचे नेहमीच स्वप्न होतं. या स्वप्नाचा आणि ध्येयाचा पाठलाग करत कठोर मेहनत घेतली. त्यासाठी गोरेगाव स्पोर्टस् क्लब येथे क्युबिंगचा तब्बल दोन महिने सराव केला. यापूर्वीही २०१७ मध्ये ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्येही डोळ्यांवर पट्टी बांधून मिरर क्यूब सर्वाधिक वेगात सोडवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.


 एका श्वासात नऊ क्युब्स

आर्थिक पाठबळ नसताना केवळ स्वतःच्या जिद्दीवर चिन्मयनं हा टप्पा पार केला. नवा गिनीज विक्रम नोंदवण्यासाठी चिन्मयला चार पिरॅमिक्स (रुबिक क्युब्स) सोडवणं आवश्यक होतं. ते त्यानं केवळ १ मिनिट ४८ सेकंदांत पाण्याखाली राहून सोडवले. त्यानं तेव्हा एका श्वासात तब्बल नऊ क्युब्स सोडविले होते.

मला क्युबिंग आणि स्वीमिंग दोन्ही आवडतात. यामुळे काही नवे घडवून दाखवण्याचा विचार मनात आला. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून काही तरी नवे करण्याचा विचार केला. गिनिज बुकच्या लोकांकडे या आधी काही विक्रम झाला आहे का? याची विचारणा केली. त्यानंतर पाण्यात राहून सराव केला. हळूहळू श्वास रोखून धरण्याची वेळ वाढवली. पूर्वी ३० ते ३५ सेकंद पाण्यात श्वास रोखून उभा राहायचो. परंतु नंतर १ मिनिट ५० सेकंदांपर्यंत श्वास रोखण्यात यश मिळवलं.

- चिन्मय प्रभू

चिन्मय आता आपले कौशल्य इतरांनाही शिकवत आहे. त्यानं यासाठी काेचिंग देणंही सुरू केलं आहे. आठवड्याच्या शेवटी तो क्लास घेतो. त्याच्या क्लासमध्ये सर्वात लहान विद्यार्थी ४ वर्षांचा आहे


हेही वाचा

सोच सयानी ग्रुपचे अनोखे 'व्हर्टिकल गार्डन'

खड्डे मुक्तीचा वसा उचलणारे 'पॉटहोल्स वॉरीयर'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा