Advertisement

खड्डे मुक्तीचा वसा उचलणारे 'पॉटहोल्स वॉरीयर'

या खड्ड्यांवरून जास्तीत जास्त मुंबईकर काय करू शकतात तर प्रशासनाला जबाबदार धरू शकतो. पण या दोघा मुंबईकरांनी ब्लेम गेम खेळण्यापेक्षा या समस्येवर उपाय शोधला आहे.

SHARES

मुंबईत खड्डे ही एक मोठी समस्या आहे. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमुळे मुंबईकर जास्त त्रस्त असतात. या खड्ड्यांवरून  मुंबईकर जास्तीत जास्त काय करू शकतात, तर प्रशासनाला जबाबदार धरू शकतात. पण दोघा मुंबईकरांनी ब्लेम गेम खेळण्यापेक्षा या समस्येवर उपाय शोधला आहे. कुणावरही दोषारोप न करता हे दोघे शांतपणे खड्डे भरण्याच्या कामात दंग आहेत.खड्डे मुक्त मोहीम

माहिममधील इरफान माछीवाला आणि मुश्ताक अन्सारी ही जोडी गेली अनेक वर्ष मुंबईतील खड्डे भरण्याचं काम करत आहे. खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम खाते तसंच एमएमआरडीएचे लक्ष वेधूनही यंत्रणा लक्ष देत नाही, म्हणून स्वत: याची जबाबदारी उचलण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. फक्त निर्णय घेतला नाही तर त्यानुसार ते कामालाही लागले. फक्त पावसाळ्यात नाही तर वर्षभर त्यांचं काम सुरू असतं. जिथे-जिथे खड्ड्यांची समस्या आहे तिकडे दोघे जाऊन स्वखर्चानं खड्डे भरायचं काम करतात


रहिवाशांचाही पाठिंबा

एका घमेल्यात वीटा, पेव्हर ब्लॉक भरायचे. ते घमेले स्कुटीवर ठेवायचे. दिसला खड्डा की थांबायचे... विटांचा भुगा करायचा, भुग्याचा थर खड्ड्यात टाकायचा, पेव्हर ब्लॉक पद्धतशीरपणे लावायचे, खड्डा भरला की पुन्हा दुसऱ्या खड्ड्याकडे मोर्चा वळवायचा असा त्यांचा दिनक्रम आहे. त्यांच्या या कामात माहीममधील काही रहिवासीही त्यांना साथ देत आहेत. मुख्यत: माहीम ते वांद्रे परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम ते करतात. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्यानं रस्त्याच्या मधोमध पडलेलं खड्डे बुजवणं शक्य होत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेले खड्डे बुजवले जातात. रस्त्याच्या कडेनं बाइकस्वार मोठ्या प्रमाणावर जातात, किमान त्यांची तरी सोय होते.हेही वाचा

पाणी वाचवणारा ८० वर्षांचा 'वाॅटर वाॅरियर'

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा