Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,44,710
Recovered:
56,85,636
Deaths:
1,16,026
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,807
666
Maharashtra
1,39,960
9,830

पाणी वाचवणारा ८० वर्षांचा 'वाॅटर वाॅरियर'

पाण्याच्या एका थेंबाचं महत्त्व मिरारोडला राहणारे अबिद सुरती यांना समजलं. इतरांनाही याचं महत्त्व समजावं म्हणून त्यांनी ड्रॉप डेड नावाच्या संस्थेची स्थापना केली.

SHARES

पाण्याच्या एका थेंबाचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? कदाचित नसेल. म्हणूनच तर आज घरा-घरात नळामधून थेंब थेंब करत प्रचंड पाणी वाया जातं. पण पाण्याच्या एका थेंबाचं महत्त्व मिरारोडला राहणारे अबिद सुरती यांना समजलं. इतरांनाही याचं महत्त्व समजावं म्हणून त्यांनी ड्रॉप डेड नावाच्या संस्थेची स्थापना केली.


थेंबे थेंबे तळे साचे...

८൦ वर्षीय आबिद सुरती राष्ट्रीय पुरस्कार विजेते असून ते लेखक, कार्टूनिस्ट आणि कलाकार आहेत. त्याच्याकडे ८० पुस्तके आहेत. प्रत्येक रविवारी सकाळी मिरा रोड इथल्या अपार्टमेंटच्या प्रत्येक मजल्यावर जातात. प्रत्येकाच्या घरा-घरात जाऊन ते एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे, 'तुमच्या घरात नळातून पाणी गळते का?’ जर कुणी हो उत्तर दिलं तर ते त्याच्या घरी प्लंबरला घेऊन जाऊन मोफत नळाची दुरुस्ती करून देतात. याशिवाय घरा-घरात जाऊन पाण्याचं महत्त्व देखील समजवतात. आतापर्यंत त्यांनी १० दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यास मदत केली आहे. हे खरच कौतुकास्पद आहे.


पाण्यासाठी संघर्ष पाहिला

मुंबईच्या फुटपाथवर मी लहानाचा मोठा झालो. लहान असताना माझी आई पाण्यासाठी सकाळी ४ वाजता रांगेत उभी राहायची. पाण्यासाठी लोकांना एकमेकांशी लढताना मी पाहिलं आहे. त्यामुळे जेव्हा मी घरा-घरात असं पाणी वाया जाताना पाहतो तेव्हा मी स्वत:ला खूप हतबल समजतो. पाण्यासाठीचा लोकांचा संघर्ष मी लहानपणापासून पाहिला आहे, म्हणूनच पाणी वाया गेलंलं पाहून मला त्रास होतो.

अबिद सुरती, संस्थापक ड्रॉप डेड


प्रत्येक थेंब वाचवा

२००७ मध्ये एका न्यूजपेपरमध्ये आलेला अहवाल वाचून अबिद चिंतेत पडले. एका सेकंदाला नळातून पडणारा एक ड्रॉप म्हणजे महिन्याला १००० हजार लिटर एवढं पाणी वाया जातं, असं अहवालात म्हटलं होतं. १००० हजार लिटर पाणी म्हणजे पाण्याच्या १००० बाटल्या इतकं पाणी वाया घालवलं जातं. म्हणून त्यांनी २००७ पासून ड्रॉप डेड फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. 'प्रत्येक थेंब वाचवा' या टॅगलाईन अंतर्गत ते आणि त्यांचे सहकारी घरा-घरात जाऊन गळते नळ ठिक करतात आणि हजारो लिटर पाणी वाचवतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं अबिद सुरती हे मुंबईचे हिरो आहेत. त्यांच्या या कार्याचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच आहे.  


नाहीतर मुंबईचं केरळ होईल

एकिकडे महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय. घोटभर पाण्यासाठी लोकांना मैल मैल जावं लागतंय. तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पाण्याची नासाडी केली जाते. आज जर आपल्याला पाण्याचा महत्त्व समजलं नाही तर लवकरच मुंबईवर केरळसारखी परिस्थिती उद्धभवू शकते. त्यामुळे आता अबिद सुरती यांना साथ द्यायची नाहीतर भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा. तुम्ही कोणाच्या बाजूनं आहाता? हा निर्णय आता तुम्हाला करायचा आहे.हेही वाचा

'तिनं' टाकाऊ जिन्सपासून बनवल्या टिकाऊ बॅग्स


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा