Advertisement

'तिनं' टाकाऊ जिन्सपासून बनवल्या टिकाऊ बॅग्स

सौम्या कल्लुरी या तरूणीनं 'द्विज' (Dwij) नावाची कंपनी सुरू केली आहे. या कंपनीत टाकाऊ जिन्सपासून चांगल्या आणि टिकाऊ बॅग्स बनवल्या जातात.

'तिनं' टाकाऊ जिन्सपासून बनवल्या टिकाऊ बॅग्स
SHARES

विविध उत्पादनांचे कारखाने, गाड्यांमधून निघणारा कार्बन डायऑक्साईड, कचऱ्यांमुळे भरलेले डंपिंग ग्राऊंड किंवा इतर ऊर्जाक्षेत्र या सर्वांना आपण प्रदूषणास कारणीभूत ठरवतो. यामुळेच प्रदूषण होतं, असा सर्वसाधारण समज असतो. हा मुद्दा पूर्णपणे खोडता देखील येणार नाही, हे खरं आहे. या सर्वांमुळे प्रदूषण तर होतंच. पण त्याहून अधिक प्रदूषण होतं ते आपण वापरणाऱ्या कपड्यांपासून. तुम्ही अगदी बरोबर वाचताय?  


आपले जुने कपडे नकोसे वाटू लागले किंवा आऊटऑफ फॅशन झाले की थेट शॉपिंग मॉलमधून नव्या कपड्यांची खरेदी केली जाते. कधी तर गरज नसताना स्टेटस म्हणून कपडे खरेदी केले जातात. खरं तर फॅशन आणि वस्त्रोद्योग क्षेत्र या वाढत्या प्रदूषणास जबाबदार आहेत. तेल उद्योग क्षेत्रानंतर, फॅशन आणि वस्त्रोद्योग क्षेत्र हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषण करणारे क्षेत्र ठरले आहे.

सौम्या कल्लुरीचा पुढाकार 

आता हेच बघा ना, तरूणांच्या अधिक पसंतीस उतरते ती जीन्स डेनिमची असो वा कुठली दुसरी, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या जीन्समुळे देखील प्रदूषण होतं. पण जीन्सपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी एका २७ वर्षांच्या तरुणीनं पुढाकार घेतला आहे. सौम्या कल्लुरी या तरूणीनं 'द्विज' (Dwij) नावाची कंपनी सुरू केली आहे. या कंपनीत टाकाऊ जीन्सपासून चांगल्या आणि टिकाऊ बॅग्स बनवल्या जातात. आतापर्यंत तिनं ३ हजार वापरलेल्या डेनिम जीन्सपासून आणि ५०० मीटर औद्योगिक डेनिमपासून बॅग्स बनवल्या आहेत

द्विजनं बनवलेली बॅग

पाण्याची नासाडीप्रदूषणही

जीन्स बनवण्यासाठी कापसाचा अधिक प्रमाणात वापर होतो. कापूस पिकवण्यासाठी देखील अधिक पाणी लागते. त्यानंतर एक जोडी जीन्स बनवण्यासाठी ९४६ लीटर पाणी लागते. शिवाय योग्य पोत मिळवण्यासाठी ४२ लीटर अधिक पाणी लागते. या व्यवसायाशी संबंधीत प्रत्येक टप्प्यावर, अनेक प्रक्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी होत असते. महत्वाचे म्हणजे जगभरात जो कापूस पिकवला जातो, त्याला किड लागू नये म्हणून, त्यात जनुकीय बदल केलेले असतात. त्याचबरोबरच अशा कापसावर अधिक विषारी किटकनाशकांचाही वापर केला जातो. या सगळ्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होतो.

- सौम्या कल्लुरी



धोकादायक पॉलिएस्टर 

जीन्समध्ये फक्त कॉटनचाच नाही तर थोड्या प्रमाणात पॉलिएस्टरचा देखील वापर केला जातो. कापडाचा हा प्रकार तुलनेने स्वस्तात उपलब्ध असतो. पॉलिएस्टर निर्मिती करताना एस्टरीकरण आणि बहुवारिकीकरण असे दोन टप्पे पार पाडावे लागतात. वेगवेगळ्या नैसर्गिक तंतूंत मिसळण्यासाठी वेगवेगळ्या तंतू लांबीचे पॉलिएस्टर तंतू तयार केले जातात. नायलॉनसारखेच पॉलिएस्टरचे औष्णिक स्थिरीकरण केले जाते. त्यामुळे अशा प्रकारचा कपडा जेव्हा धुतला जातो, तेव्हा त्यातून निघणाऱ्या सुक्ष्म तंतूंसोबत प्लास्टिकचा अंशही निघत असतो. ज्यामुळे समुद्राच्या पाण्यातल्या प्लास्टिकचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे सागरी जैविक साखळी धोक्यात आली आहे.

 


आरोग्यावर परिणाम 

कपड्यांना रंग देण्यासाठी नॉनायलफेनॉल एथॉक्सीलेट म्हणजेच एन.पी.. या रसायनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हे रसायन आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत घातक आहे. या रसायनामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. अर्थात या घातक रसायनाच्या वापरावर युरोपीय महासंघातील देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.


कसं रोखाल कपड्याचं प्रदूषण?

) गरज नसताना किंवा फक्त बदलत्या फॅशनचा दिखावा करण्यासाठी कपडे खरेदी करू नका.

) कपडे होत नसतील तर ते अल्टर करून वापरा. तरी देखील वापरायचे नसतील तर एखाद्या गरजूला द्या. अशा व्यक्तीलाच द्या जो त्या कपड्यांचा वापर करत असेल. नाहीतर कपडे डंपिंग ग्राऊंडमध्ये पोहतील.

द्विजनं बनवलेली बॅग

) जुन्या कपड्यांचा पुर्नवापर करण्याची सवय लावा. त्यापासून बॅग, मोबाइल कव्हर किंवा इतर काही वस्तू बनवता येऊ शकतात.

) कपडे घेतानाच विचार करावा की त्यात कुठले घटक आहेत किंवा कुठल्या प्रकारच्या कापडाचा त्यात वापर केला आहे.  हे कपड्यावरील लेबलवर पाहा.

) जुने, फिट होत नसलेले कपडे आपल्या घरातच किंवा नातेवाईकांना द्यावेत. नाही तर कपड्यांपासून गोदडी बनवावी.




हेही वाचा

'या' गुरुद्वारात वाजतं सायलेंट भजन

कचऱ्याचं खत बनवून परिसर केला प्रदूषणमुक्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा