Parel
  कचऱ्याचं खत बनवून परिसर केला प्रदूषणमुक्त

  कचऱ्याचं खत बनवून परिसर केला प्रदूषणमुक्त

  Share
  Now
  मुंबई  -  

  गेल्या काही वर्षांत परळ ते वरळी या विभागात विकास कामे झपाट्याने झाली आहेत. या विभागात बऱ्याच मिल आणि मिल कामगारांची वसाहत होती. पण काळ बदलला आणि मिल बंद झाल्या, तिथे काम करणारी लोकं आणि त्यांच्या वसाहती काळासोबत ओस पडायला लागल्या.

  या मिलसंदर्भात सरकारने कायद्यात बदल केला. आपल्या सोयीनुसार..! आणि म्हणून आज मिलच्या जागी व्यापार केंद्रे किंवा मॉल तयार झाले आहेत. मिल वसाहतीच्या चाळी काही ठिकाणी आहेत तर काही ठिकाणी नाहीत असं चित्र या विभागात बघायला मिळत आहे.या विभागात व्यापार केंद्र किंवा मॉल असल्याने फोल्टिंग पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न हा प्रमुख विषय बनला आहे. त्यावरच उपाय काढण्यासाठी या विभागातल्या लोकांनी सहभाग घेऊन २०१२ साली प्रगत परिसर व्यवस्थापनची स्थापना केली. ज्याचे नाव वरळी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन असे ठेवण्यात आले.

  या प्रगत परिसर व्यवस्थापनाकडे(एएलएम) १२ गृहनिर्माण संस्था, ८ कॉर्पोरेट आणि चार प्रमुख मार्ग आहेत. यामध्ये दैनिक शिवनेरी मार्ग, डॉक्टर ई मॉसेज मार्गाचा काही भाग, गणपतराव कदम मार्ग आणि सेनापती बापट मार्गाचा काही भाग येतो. या सर्व विभागाची एकूण लोकसंख्या 60 हजाराच्या घरात जाते 

  - केशव शेनॉय, सचिव, वरळी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन

  हा विभाग कचरामुक्त करायचा आहे आणि त्याचा पथदर्शी प्रकल्प त्याच विभागात मॅरेथॉन हौसिंग गृहनिर्माण संस्थेद्वारे तयार केला जातो. यामध्ये घरातल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली जाते आणि काही कचऱ्याचे खत बनवून जवळपासच्या झाडांनाही वापरले जाते. यासाठी संबंधित गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट स्टेशन बनवण्यात आले आहे, जे आज यशस्वीपणे काम करत आहे. या विभागात प्रकल्पांतर्गत जवळपास ४०० मोठी झाडे लावण्यात आली आहेत. फुटपाथ स्वछ व हरित करून त्याचे शुशोभिकरण करण्यात आले आहे.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.