Advertisement

शाब्बास मुंबईकरांनो, दिवाळीतही वायू प्रदूषण ‘नाॅर्मल’


शाब्बास मुंबईकरांनो, दिवाळीतही वायू प्रदूषण ‘नाॅर्मल’
SHARES

दिवाळीचा सण साजरा होत असताना देशभरात जागोजागाी फटाके वाजवले जात आहेत. मात्र फटाक्यांमुळे वायू प्रदूषणाचा स्तर देखील वाढला आहे. एका बाजूला दिल्लीतील वायू प्रदूषणाचा स्तर गंभीर श्रेणीत पोहोचला तर दुसऱ्या बाजूला मुंबई, पुण्यातील वायू प्रदूषण अत्यंत कमी राहिलं. 

सोमवारी ठिकठिकाणी वायू प्रदूषणाची चाचणी करण्यात आली. या चाचणीत राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर (एअर क्वालिटी इंडेक्स) ३२७ वर पोहोचला. हा आकडा गंभीर श्रेणीत मोडतो. या तुलनेत शनिवारी आणि रविवारी रात्री मुंबई आणि पुण्यात अत्यंत कमी प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने प्रदूषणाचा स्तर अत्यंत कमी राहिला. मुंबई, पुण्याची हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स) सोमवारी अनुक्रमे ०८७ आणि ०४७ इतकी होती. 

एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ० ते ५० हा आकडा हवेची गुणवत्ता चांगली असल्याचं दर्शवतो. तर ५० ते १०० ठिक, १०० ते २०० चिंताग्रस्त, २०० ते ३०० वाईट, ३०० ते ४०० अत्यंत वाईट आणि ४०० ते ५०० दरम्यानचा आकडा गंभीर श्रेणीत येतो.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा