मुंबईत ढगाळ वातावरण, चक्रिवादळाचा परिणाम

(Representational Image)
(Representational Image)

मुंबईत मंगळवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक समाधानकारक श्रेणीत 95 वर नोंदवला गेला आहे.

आंद्र प्रदेश आणि उडिसामध्ये आलेल्या चक्रिवादळाचा परिणाम मुंबईतल्या हवामानावर झाला आहे. पुढील ४८ तास असं ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण चक्रिवादळामुळे मुंबईत पाऊस पडणार नाही, असं हवामान खात्या तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

त्याचप्रमाणे, मंगळवारी नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रूझ वेधशाळेने अनुक्रमे कमाल आणि किमान तापमान 33.5 अंश सेल्सिअस आणि 28.2 अंश सेल्सिअस नोंदवले.

दुसरीकडे, कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27.6 अंश नोंदले गेले.

पुण्यात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातही अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातील हवेचा दर्जा निर्देशांक मध्यम श्रेणीत 165 वर नोंदवला गेला.

नागपूरमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नागपुरातही ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. नागपुरातील हवेच्याची गुणवत्ता निर्देशांकाची 242 वर म्हणजेच अत्यंत वाईट श्रेणीत नोंदवण्यात आला आहे.


हेही वाचा

आदित्य ठाकरेंचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बारगळला, पवईत सायकल ट्रॅकला नकार

नवीन इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग पॉइंट अनिवार्य करण्याची पालिकेची योजना

पुढील बातमी
इतर बातम्या