मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या ३ व ४ मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. या दोन दिवसांत मुबई, ठाणे, डहाणू, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशी माहिती स्कायमेटनं दिली आहे. तसंच हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्रप्रदेश व पूर्वेकडील पश्चिम बंगाल, ओडीशा या राज्यांच्या किनारपट्टीला 'फानी' या चक्रीवादळाचा धोका वर्तविण्यात आला आहे. तसंच, शुक्रवारी दुपारपर्यंत हे वादळ ओडीशा किनारपट्टीला धडकणार आहे.
या वादळामुळे बंगालच्या खाडीत उच्च दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचा परिणाम अरबी समुद्रात देखील दिसून येणार असल्यामुळं शुक्रवारी व शनिवारी मुंबई ठाणे, डहाणू, रत्नागिरी व सिंधूदुर्ग भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा -
राणीबागेत आली बिबळ्या, कोल्ह्याची जोडी, लवकरच घडणार दर्शन
मुंबई-पुणे, मुंबई-मडगाव प्रवास आता होणार आणखीनच वेगानं