Advertisement

मुंबई-पुणे, मुंबई-मडगाव प्रवास होणार आणखी वेगानं

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्स्प्रेसच्या डब्यांच्या जागी एलएचबी डबे बसविण्याला रेल्वे मंडळानं मंजुरी दिली आहे. या एलएचबी डब्यांमुळं या दोन्ही एक्स्प्रेसमध्ये ताशी १३० किमी धावण्याची क्षमता येणार आहे.

मुंबई-पुणे, मुंबई-मडगाव प्रवास होणार आणखी वेगानं
SHARES

पुणे आणि कोकण मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखीनच सुखकर होणार आहे. लवकरच मुंबई-पुणे आणि मुंबई-मडगाव मार्गावरील प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवास करता येणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी तसंच मुंबई-मडगाव मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळं या एक्स्प्रेस ताशी १३० किमी वेगानं धावणार आहेत.


एलएचबी डबे

प्रवाशांची सुरक्षा आणि प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी अपघातरोधक व उच्च क्षमतेच्या एलएचबी डब्यांची निर्मिती चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. आगामी काळात टप्प्याटप्यानं सर्व एक्स्प्रेस डबे  एलएचबी करण्यात येणार असल्याच समजतं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला लिकें हाँफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

गाडी क्रमांक १०१११/१०११२ मुंबई-मडगाव कोकणकन्या आणि गाडी क्रमांक १०१०३/१०१०४ मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस या १० जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नवीन एलएचबी डब्यांसह धावणार आहेत. या एक्स्प्रेस २२ डब्यांच्या असणार असून यात ४ जनरल डबे आणि ९ स्लीपर डब्यांचा समावेश आहे.


रेल्वे मंडळाची मंजुरी 

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्स्प्रेसच्या डब्यांच्या जागी एलएचबी डबे बसविण्याला रेल्वे मंडळानं मंजुरी दिली आहे. या एलएचबी डब्यांमुळं या दोन्ही एक्स्प्रेसमध्ये ताशी १३० किमी धावण्याची क्षमता येणार आहे. पुढील ६ ते ८ महिन्यांत दोन्ही एक्स्प्रेस एलएचबी डब्यांसह मार्गस्थ होणार असल्याची माहिती मिळत आहे.



हेही वाचा -

राणीबागेत आली बिबळ्या, कोल्ह्याची जोडी, लवकरच घडणार दर्शन

जेट कर्मचाऱ्यांचे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आंदोलन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा