खासगी हवामान संस्थेनं ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा दावा केला होता. तर सोमवारी मान्सून (Monsoon) केरळात दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं (IMD) सांगितलं आहे. त्या अनुषंगाने केरळच्या ९ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये अलपुझा, कोल्लम, पथनमथिट्टा, तिरुवनंतपुरम, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
(Mumbai Rain) रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस पडला. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसणार आहे. दरम्यान ३ आणि ४ जूनला महाराष्ट्रातल्या काही भागात आणि गुजरातमध्ये वादळी पावसाचासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD)नं जाहीर केलं की, येत्या ४८ तासात दक्षिण-पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्यानं राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ३ ते ४ जून कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे संचालक एम. मोहपात्रा यांनी सांगितलं की, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात आणि लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र बनत आहेत. दुसऱ्या दिवशी हा अजून वाढेल आणि सायक्लोनमध्ये बदलेल. त्यानंतर हा उत्तरेकडे येईल आणि गुजरातजवळ पोहोचेल. ३ जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येईल.
दरम्यान अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते 3 जूनपर्यंत गुजरातची किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अरबी समुद्रासाठी रविवारी दुहेरी दाबाचा अलर्ट जारी केला.
हवामान खात्यानुसार, अरबी समुद्रात २ वादळे तयार होत आहेत. 1 आफ्रिकी िकनारपट्टीलगतच्या समुद्रावर आहे. ते ओमान आणि येमेनकडे वळण्याची शक्यता आहे. दुसरे वादळ भारताच्या निकट आहे. ते पुढील २४ तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहे.