राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार

15 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानात (Maharashtra Temprature) वाढ होणार आहे. मुंबईत कालच्या तुलनेत 7.6 अंशांनी तापमान वाढलं आहे.

मुंबईतील तापमान गेल्या एक दोन दिवसांपासून वाढ होत असून मुंबईतील कमाल तापमान देखील 36 अंशांवर गेले आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअसची नोंद तर कुलाब्यात 23.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

रविवारी (12 फेब्रुवारी) मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेत वाढ झाली आहे.

14 फेब्रुवारी देखील दोन्ही भागातील किमान तापमान कमीच राहणार आहे, मात्र 15 फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबादमध्ये 10.2 अंश सेल्सिअस, नाशिक 10.9, पुणे 10.6, महाबळेश्वर 13.4, बारामती 12.8 आणि जळगावात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबईकरांना दोन दिवसांपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत रविवारी कमाल तापमान 36 अंशांवर गेले होते. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


हेही वाचा

श्वसनाच्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ९ टक्के गोवंडीकर

BMC Budget 2023-24: मुंबईतल्या 'या' 5 गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर उभारणार

पुढील बातमी
इतर बातम्या