Advertisement

BMC budget 2023-24: मुंबईतल्या 'या' 5 गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर उभारणार

पालिका २०२३-२४ च्या बजेटमध्ये (BMC budget) पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ५ एअर प्युरीफायर प्रस्तावित केले आहेत.

BMC budget 2023-24: मुंबईतल्या 'या' 5 गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर उभारणार
SHARES

वाढत्या प्रदूषणाच्या (Pollution) पातळीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) शहरात एअर प्युरिफायर टॉवर (Air Purifier Towers) बसवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २०२३-२४ च्या पालिका अर्थसंकल्पात (bmc budget 2023) एअर प्युरीफायरचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

पालिका २०२३-२४ च्या बजेटमध्ये (BMC budget) पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ५ एअर प्युरीफायर प्रस्तावित केले आहेत. दहिसर टोल नाका, मुलुंड चेक नाका, मानखुर्द, कला नगर आणि हाजी अली जंक्शन अशा गर्दीच्या भागात पाच एअर प्युरिफायर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर प्युरीफायर लावण्याचे निर्देश दिले होते. आता या आदेशाबाबत माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हा ‘जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यय’ असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ठाकरे म्हणतात, ‘मी वर्तमानपत्रात वाचले की प्रदूषणावर बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणजे, बीएमसीला ‘एअर प्युरिफायर टॉवर्स’ लावण्याचा आदेश आहे. प्रदूषण कमी करण्यावर काम करणारे माजी पर्यावरण मंत्री या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की, हे टॉवर्स म्हणजे जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यय आहे.’

 ते पुढे म्हणतात, ‘एअर प्युरिफायर टॉवर्सऐवजी सरकारने ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ते म्हणजे- प्रदूषणाचे स्रोत ओळखणे आणि त्यांचे अधिक चांगले आयोजन करणे, प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन केले जाईल याची खात्री करणे. या सरकारला या मतलबी आणि स्वार्थी लोकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांना रोखण्याची हिंमत कोणात नाही.’

ठाकरे म्हणतात, ‘हे टॉवर्स म्हणजे जी समस्या वरवर सोडवता येत नाही, अशा समस्येचे वरवरचे उत्तर आहे. या समस्यांना ओळखून त्यावर उपाययोजना करणारा आमच्या कार्यकाळात तयार केलेला हवामान कृती आराखडा बीएमसीने आधीच बंद केला आहे.’



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा