२०५० पर्यंत मुंबईसह 'या' ३० शहरांमध्ये जाणवेल गंभीर पाणी समस्या

जागतिक वन्यजीव निधी (WWF)नं येत्या काळात पाण्याच्या समस्येबाबत भारताला चिंताजनक अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार, २०५० पर्यंत भारतातील ३० मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्यांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

अहवालात मनूद केलं आहे की, या शहरांमध्ये मुंबई, कोलकाता, जयपूर, अमृतसर आणि कोझिकोड या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये पाणी नियोजनासाठी लवकर काही प्रभावी पावलं उचलली गेली नाहीत तर येणाऱ्या काळात ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनू शकेल.

पाणी टंचाईचा सामना केवळ भारतालाच भेडसावणार आहे असं नाही. तर जगभरातील इतर शहरांचा देखील यात समावेश आहे. चीनच्या बीजिंग शहराव्यतिरिक्त अर्ध्या चीनचा समावेश आहे. त्याखालोखाल जकार्ता, जोहान्सबर्ग, इस्तंबूल, हाँगकाँग, मक्का आणि रिओ डी जनेरिओ ही शहरे आहेत.

सध्या जगभरात पाण्याचे संकट एक गंभीर समस्या बनली आहे. वृत्तानुसार जगातील जवळपास एक चतुर्थांश लोक शुद्ध पाणी पिण्यापासून वंचित आहेत. तर ४० टक्के लोकांचं स्वत:चं प्रसाधनगृह देखील नाही.

डब्ल्यूडब्ल्यूएफच्या म्हणण्यानुसार, २०५० पर्यंत जगातील सुमारे १०० शहरे पाण्याच्या धोक्यामुळे बाधित होतील. ही १०० शहरे एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के आहेत. इतकी मोठी लोकसंख्या कोणत्याही देशाची आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे पूर्ण किंवा उलटवू शकते.

हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंग समस्या, भारत सरकारनं केलेला स्मार्ट सिटी प्रकल्प, झाडे तोडणे, काँक्रीटचे जंगल या कारणांमुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. वाढती शहरीकरण, भूगर्भातील पाण्याचे अयोग्य आणि अमर्याद शोषण, पाणी नियोजनात शासकीय आणि प्रशासकीय इच्छेचा अभाव ही इतर अनेक कारणे आहेत.

भविष्यात या समस्येचं निराकरण करण्यासाठी देशानं पुरेशी पावलं उचलली नाहीत. तर देश आणि जगात सर्वात मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागेल.


हेही वाचा

हवामानाची गुणवत्ता खालावली, मुंबईतील 'हे' ठिकाण सर्वाधिक प्रदूषित

प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडल्यानं पालिकेला दंड

पुढील बातमी
इतर बातम्या