Advertisement

हवामानाची गुणवत्ता खालावली, मुंबईतील 'हे' ठिकाण सर्वाधिक प्रदूषित

रविवारी १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (AOI) पातळी १५६ नोंदवली गेली.

हवामानाची गुणवत्ता खालावली, मुंबईतील 'हे' ठिकाण सर्वाधिक प्रदूषित
SHARES

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धासळल्याचं समोर आलं. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा काही आठवड्यांनंतर मुंबईचे वातावरण स्वच्छ होते.

पण आता पुन्हा एकदा मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढत आहे. कारण अनलॉक अंतर्गत अनेक उद्योग, कार्यालये आणि सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

रविवारी १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (AOI) पातळी १५६ नोंदवली गेली. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वेदर हवामान अंदाज आणि संशोधन (SAFAR) च्या मते, १०१ ते २०० दरम्यान एक्यूआय पातळी मध्यम आहे. पण संवेदनशील लोकांच्या आरोग्यासाठी हे धोकादायक आहे.

कोरोनामुळे लॉकडाउन सुरू होण्याच्या अगदी अगोदर १८ मार्च रोजी एक्यूआय १७२ होता. काही आठवड्यात तो कमी होऊन १३० पर्यंत आला. अहवालानुसार, काही काळापूर्वी एक्यूआय 'चांगल्या' आणि 'समाधानकारक' स्तरावर होता. १३ मार्चपासून, AOIची उच्च पातळी नोंदवली गेली, जी १२१ होती.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)मधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. तिथला AOI ३०५ आहे. जोकी सर्वात अधिक प्रदूणित आहे. तथापि, शुद्ध हवा वरळीध्ये नोंदवली गेली आहेत. तिथला एक्यूआय ३८ नोंदवला गेला आहे.



हेही वाचा

प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडल्यानं पालिकेला दंड

राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘पक्षी सप्ताह’

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा