दिगंबर आणि माधवनं शिवला दिला सल्ला

बिग बॉस मराठीच्या घरात आता पुन्हा जुन्या आठवणी, जुने सदस्य, ती मैत्री, त्या गप्पा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. कारण, घरामध्ये सिझन २ चे घराबाहेर पडलेले काही सदस्यही येणार आहेत. हे सदस्य घरात आल्यावर कोणते सल्ले देतील? हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. माधव देवचके आणि दिगंबर नाईक घरामध्ये जाणार आहेत. दोघेही शिवला मोलाचा सल्ला देणार आहेत. महेश मांजरेकर प्रत्येक आठवड्याला शिव आणि वीणाला जो सल्ला देतात, वा घरातील इतर सदस्य, शिवच्या घरचे जो सल्ला शिवला देऊन गेले होते तोच सल्ला आज माधव आणि दिगंबर त्याला देणार आहेत...

शिव काय उत्तर देईल ?

माधव आणि दिगंबर यांनी शिवला आपापल्या शैलीत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनीही आपापल्या परीनं शिवला सल्लाही दिला आहे. दिगंबर नाईक म्हणाला की, मला आज ही संधी मिळाली म्हणून मी आलो आहे. परत सांगणार नाही मी अधिकारानं सांगतो आहे तुला शेवटपर्यंत जायचं असेल तर ते तू ठरव कसं जायचं? आणि प्रश्न देखील विचारला, तू सगळ्यांनाच हो म्हणतोस आणि मग कसा बदलतोस? बघूया यावर शिव काय उत्तर देईल ? त्याला हे म्हणणे पटेल का ? दिगंबरचं म्हणणं शिवला कितपत पटतं आणि तो आपल्या वागण्यात बदल करतो का ते पहाणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.

दिल दुखा है

माधव एक सुंदर कविता शिवला ऐकवणार आहे. शिवनं योग्य तो सल्ला घ्यावा त्यातून 'दिल दुखा है, लेकीन तुटा तो नही है, उम्मीद का दामन छुटा तो नही है...' या ओळींच्या माध्यमातून माधवनं आपलं मत व्यक्त केलं आहे. माधवनं शिवला समजावलंही आहे. फार थोडेच दिवस उरले आहेत. इतक्या छान प्रकारे दिवस गेले आहेत. कोणालाही तुझा कुठल्याही प्रकारचा राग येऊ देऊ नकोस. मी काय म्हणतो आहे ते फक्त तुला कळेल आणि मला तेच हवं आहे. आता नक्की याचा अर्थ काय आहे हे आजच्या भागामध्ये कळेलच. वीणाला माधव म्हणाला की, तुला काहीच सांगायची गरज नाही. कारण तुला जे पटतं तेच तू करतेस.


हेही वाचा -

प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

येतेय ‘स्वराज्यजननी जिजाऊं'


पुढील बातमी
इतर बातम्या