डरना मना है! मुंबईत वॉक विथ घोस्ट!

आत्तापर्यंत मॉर्निंग वॉक, कॅट वॉक, फोटो वॉक हे ऐकलंच असेल. पण तुम्ही कधी 'घोस्ट वॉक' ऐकलं आहे का? 'घोस्ट वॉक'... बापरे! विचार करूनच त त प प झाली असेल ना तुमची? मला काही जमणार नाही बुवा. असं काही जण बोलून मोकळे झाले असतील. मग ही बातमी आहे काही तरी वेगळं आणि साहसी करणाऱ्यांसाठी!

घोस्ट वॉक म्हणजे नेमकं काय?

'घोस्ट वॉक' असा काही प्रकार असतो यावर तुमचा विश्वासच बसत नसेल. पण मुंबईसारख्या शहरात लवकरच तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. 'घोस्ट वॉक' म्हणजे भुतांचा शोध घेणं. खाकी टूर्सतर्फे मुंबईत 'ग्रिसली गिरगाव' घोस्ट वॉक आयोजित करण्यात आला आहे. १८ नोव्हेंबरच्या रात्री तुम्ही या 'घोस्ट वॉक'चा अनुभव घेऊ शकता. रात्री ९ वाजता या घोस्ट वॉकला सुरुवात होईल.

मरीन लाइन्स स्टेशन जवळील एस. के. पाटील उद्यान इथून या घोस्ट वॉकला सुरुवात होणार आहे. अंदाजे २ किलोमीटरचा पुढचा प्रवास असेल. २ किलोमीटरच्या प्रवासासाठी २ ते ३ तास लागतील. या वॉक दरम्यान एक पडीक चाळ, घोड्यांचा तबेला अशा भयावह जागांना तुम्हाला भेट देता येणार आहे. तसंच, या भयावह जागांचा इतिहास तुम्हाला समजून घेण्याची संधीच मिळणार आहे. तुम्हाला भुतांच्या गोष्टी ऐकण्यामध्ये रूची असेल, तर तुम्ही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.

कुठे कराल नोंदणी?

https://www.payumoney.com/events/#/buyTickets/GrislyGirgaon18Nov17 या लिंकवर तुम्ही नोंदणी करू शकता. यासाठी तुम्हाला ८൦൦ रुपये मोजावे लागतील. कॉलेज स्टुडंट्ससाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटांमध्ये ५൦ टक्के सूट ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजलाही भेट देऊ शकता.


हेही वाचा

लहानपण दे गा देवा!

सायकल नाही हो, इथे 'हार्ले डेव्हिडसन' मिळते भाड्याने!

पुढील बातमी
इतर बातम्या