Advertisement

सायकल नाही हो, इथे 'हार्ले डेव्हिडसन' मिळते भाड्याने!

हार्ले डेव्हिडसन बाईक घ्यायचं म्हटलं तर हातात लाखो रूपये हवेत. पण हे काही सर्वांना शक्य होण्यासारखं नाही. हाच विचार करून 'रेबल राईड'नं ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. त्यामुळे तुमचं स्वप्न आता नक्कीच पूर्ण होईल.

सायकल नाही हो, इथे 'हार्ले डेव्हिडसन' मिळते भाड्याने!
SHARES

विकेंडमध्ये मस्त बाईक घ्यावी आणि भटकंतीला निघावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यात जर बाईक ही 'हार्ली डेव्हिडसन' असेल तर क्या बात है? भटकंती आणि ते पण हार्ले डेव्हिडसन बाईकवरून. व्वा! एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय ना? पण तुमचं हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. माझ्याकडे तर साधी बाईक आहे. मग हार्ले डेव्हिडसनवर बसून भटकंती कशी शक्य आहे बुवा? असाच प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण टेंशन नॉट. आता याची सुद्धा सोय झाली आहे बरं का?



हार्ले डेव्हिडसन बाईक घ्यायचं म्हटलं तर हातात लाखो रूपये हवेत. पण हे काही सर्वांना शक्य होण्यासारखं नाही. हाच विचार करून 'रेबल राईड'नं ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. त्यामुळे  तुमचं स्वप्न आता नक्कीच पूर्ण होईल.



नक्की काय संकल्पना आहे?

रेबल राईड तुम्हाला हार्ले डेव्हिडसन रेंटवर देऊ शकते. हो हो. तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. सायकल रेंटवर घेतात तशी तुम्हाला हार्ले डेव्हिडसन रेंटवर मिळू शकते. यासाठी तुम्हाला फक्त ड्राइव्हिंग लायसन्सची कॉपी आणि आणखी एक आयडी प्रुफ द्यावं लागेल. 


कसा असेल प्लॅन?

सध्या रेबल राईडकडे हार्ले डेव्हिडसन, हार्ले डेव्हिडसन आर्यन ८८३, क्लासिक इनफिल्ड ५०० आणि हिमालयन इनफिल्ड उपलब्ध आहे. हार्ली डेव्हिडसन, हार्ले डेव्हिडसन आर्यन ८८३ या बाईक्सचे एका तासासाठी २९२ आकारले जातील. क्लासिक इन्फिल्ड ५൦൦ आणि हिमालयन रॉयल इनफिल्ड या बाईक्सचे एका तासासाठी ८१ रूपये आकारले जातील.



लवकरच कावासाकी निंजा ही बाईकसुद्धा रेबल राईडकडे उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्हाला ५ हजार रूपये डिपाॅजीट द्यावं लागेल. तुम्हाला बाईकमध्ये पेट्रोल भरून दिलं जाईल. पण नंतर पेट्रोलचा खर्च तुम्हाला स्वत: करावा लागेल.

जर कधी ट्रॅफिक पोलिसांनी बाईक अडवली, तर तुमचाकडे बाईकचे कागदपत्र म्हणजेच पियुसी, बाईक इनशॉरंस आणि आरसी बुक असणं आवश्यक असतं. त्यामुळे बाईकसोबतच तुम्हाला ही कागदपत्रंही देण्यात येतील.



मी स्वत: एक बाईक रायडर आहे. अनेक शहरांमध्ये फिरलो आहे. पण अशी सुविधा कुठेच उपलब्ध नव्हती. गोव्यामध्ये तुम्हाला रेंटवर टू व्हिलर दिल्या जातात. तशीच संकल्पना एक वर्षापूर्वी आम्ही देखील सुरू केली आहे. पण आम्ही रेंटवर देणाऱ्या बाईक्स साध्यासुध्या नाहीत. हार्ले डेव्हीडसन आणि रॉयल इन्फिल्ड सारख्या महागड्या गाड्या आहेत. 

हार्ले डेव्हिडसन आणि इनफिल्ड सारख्या बाईक्सवरून लाँग ड्राइव्हला जाणं किंवा भटकंती करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. आम्ही तेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आणि माझा मित्र हर्ष हा व्यवसाय सांभाळत आहोत. हा व्यवसाय चालवणं खूप आवहानात्मक आहे. पण आम्ही मुंबईकरांना काही तरी वेगळं देतोय. मुंबईत देखील बाईक ऑन रेंटला चांगला प्रतिसाद आहे.

- आकाश सचदेव, संस्थापक



कुठे आणि कसा संपर्क साधाल?

तुम्हाला सुद्धा हार्ले डेव्हिडसन बाईकचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही रेबल राईडच्यावेबसाईटला भेट देऊ शकता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा