भारतीय संस्कृतीचा इतिहास दर्शवणारा फॅशन शो!

प्राचीन आणि आताच्या आधुनिक भारताच्या वेशभूषेत प्रकर्षाने बदल जाणवतात. येथे वेगवेगळी संस्कृती आहे. त्याप्रमाणे त्यांची वेशभूषाही वेगळी आहे. पण काळानुसार, ऋतुनुसार आणि प्रसंगानुरुप कपड्यांची फॅशनही बदलत असते. याच बदलत्या फॅशनवर आधारीत 'संदीप देसीन्झ 2017' या फॅशन शोचे आयोजन सोमवारी घाटकोपरमध्ये करण्यात आले होते.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संदीप विद्यापीठाने इंडिया फॅशन अकॅडेमी (आयएफए) या संस्थेच्या माध्यमातून 14 ऑगस्ट रोजी घाटकोपर येथील भुरीबेन गोलवाला सभागृहात फॅशन शो आयोजित केला होता.

'संदीप देसीन्झ 2017' फॅशन शो

संदीप विद्यापीठ दरवर्षी वेगवेगळी संकल्पना घेऊन फॅशन शो आयोजित करते. यंदा प्राचीन भारतापासून ते आधुनिक भारतातील बदलत्या वेशभूषेवर आधारित फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये इंडियन फॅशन अकॅडेमी (आयएफए)चे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात विद्यार्थ्यांचे 8 गट तयार करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या कपड्यांच्या माध्यमातून विविध कालखंडात दर्शवले जाणारे रंग, पोत, रचना आणि वेशभूषांचे विविध प्रकार दिसून येत होते.

बदलत्या काळानुसार भारतीय वेशभूषा कशी बदलत गेली हेच या फॅशन शोच्या माध्यमातून सादर करून स्वातंत्र्यदिनाला मानवंदना देण्याचा प्रयत्न केला.

नितीन मगर, संस्थापक, आयएफए

मानवी वेशभूषेचा इतिहास

मानवी संस्कृतीच्या उदयापासूनच भारतीय वेशभूषेला महत्त्वाचे स्थान आहे. मानवी उत्क्रांतीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात कपड्याचा तुकडा सापडला होता. त्यावरून सिंधू संस्कृतीतील मानव कपडे परिधान करत होते, असा अंदाज इतिहासकारांनी लावला. याचसोबत मंदिर आणि स्तूप यांसारख्या धार्मिक वास्तूशिल्पावर कोरलेल्या चित्रांतून सिंधू संस्कृतीतील लोक वेशभूषा परिधान करत असल्याचे इतिहासकारांना समजले.


हेही वाचा - 

फाळणी...एक कटू आठवण !

माजी सैनिक, अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी देणार ओला कंपनी

पुढील बातमी
इतर बातम्या