Advertisement

माजी सैनिक, अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी देणार ओला कंपनी


माजी सैनिक, अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी देणार ओला कंपनी
SHARES

अनेक ठिकाणी बंप्पर ऑफर किंवा अमुक कलाकारांना भेटण्याची संधी मिळेल असे अनेकवेळा ऐकायला किंवा पाहायला मिळते. पण स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक आणि अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळणार अशी जाहीरात आपण कधीच ऐकली किंवा पाहिली नसेल.

मात्र आता असाच एक अनोखा उपक्रम ओला कंपनी करणार आहे. ओलाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लष्करातील माजी सैनिक आणि अधिकाऱ्यांसोबत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. सोबतच त्यांच्याबरोबर गप्पाही करता येणार आहे. ओला शेअरच्या प्रवाशांसाठी हा पर्याय उपलब्ध असून 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2017 या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल.


कसा असेल हा कार्यक्रम?

सध्या ओला देशातील 26 शहरांमध्ये राइड शेअरिंगची सेवा देत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शेअर प्रकारांतर्गत हजारो माजी लष्करी सेवाधिकारी गाडी चालवणार आहेत. यावेळी हे जवान प्रवाशांसोबत त्यांच्या कथा शेअर करतील. सोबतच अतिगर्दी या प्रश्नाविरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.
स्वातंत्र्यदिनाच्या उपक्रमांतर्गत ओलाने आपल्या चालक भागीदारांबरोबर देशभरातील विविध लष्करी छावण्यांमध्ये धन्यवाद मानणारी भेटकार्ड पाठवली आहेत. ग्राहक शेअरिंगच्या सैनिक या उपक्रमात सॅल्यूटसैनिकसह ट्वीटरवर सहभागी होऊ शकतात.

शहरांमधील अतीगर्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहे. या मिशनचा भाग म्हणूनच हा उपक्रम राबवला जात आहे.
- विशाल कौल, मुख्यधिकारी, ओला

हेही वाचा - 

आता मुंबईकरांसाठी ओलाची 'एसी' बस, बेस्टचं काय होणार?

ओलासोबत करा मुंबई दर्शन


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement