अबब..'ओला' चे बिल 149 करोड

Mumbai
अबब..'ओला' चे बिल 149 करोड
अबब..'ओला' चे बिल 149 करोड
अबब..'ओला' चे बिल 149 करोड
अबब..'ओला' चे बिल 149 करोड
See all
मुंबई  -  

तुम्ही ओला कॅबने प्रवास करत आहात आणि जर तुम्हाला अचानक 149 कोटी रुपयांचे बिल आले तर? धक्का बसला ना? पण हा उद्योग केलाय चक्क ओला कॅब कंपनीने. एका ग्राहकाला ओला कॅबकडून चक्क 149 कोटी रुपयांचे बिल आले आहे. सुशील नरसिया असं या ग्राहकाचं नाव असून, त्याने बिलाचा फोटो ट्विटरवर टाकला असून, कंपनीविरोधात तक्रार देखील केली आहे. या प्रकारानंतर ओला कंपनीने हा सगळा प्रकार चुकीने झाल्याचं सांगितलं आहे. सुशील याने ट्विटरवर पोस्ट टाकताच लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. 

For a ride that didn't come to location specified, driver did not takeppen the door, I'm charged and how! Jai ho https://twitter.com/Olacabs">@Olacabs. Riding Uber now https://t.co/SIOAFzs77g">pic.twitter.com/SIOAFzs77g

— Sushil Narsian (@SushilNarsian) https://twitter.com/SushilNarsian/status/848169088333606913">April 1, 2017

दरम्यान सुशीलने वाकोला येथे जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. मात्र मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे ड्रायव्हरला लोकेशन मिळाले नाही. त्यामुळे सुशिलला चालत ड्रायव्हरपर्यंत जावे लागले. मात्र ड्रायव्हरने फेरी कॅन्सल झाल्याचे सांगितले. याच दरम्यान जेव्हा सुशीलने दुसरी कॅब बुक करण्यासाठी ओलाचे अॅप ओपन केले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणताही प्रवास न करता सुशील यांना 149 कोटी रुपयांचे बील आले.

आधी सुशीलला वाटलं की त्यांना कुणी तरी एप्रिल फूल केले. पण काही वेळानंतर त्यांच्या अकाऊंटमधून 127 रुपये कट करण्यात आले.  

दरम्यान, कंपनीने तांत्रिक बिघाडाचे कारण देत हा सगळा प्रकार घडल्याचे सांगत सुशील यांचे कट झालेले पैसे देखील परत केले.


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.