Advertisement

आता मुंबईकरांसाठी ओलाची 'एसी' बस, बेस्टचं काय होणार?


आता मुंबईकरांसाठी ओलाची 'एसी' बस, बेस्टचं काय होणार?
SHARES

अॅप आधारीत 'कॅब' सेवा देणाऱ्या कंपन्यांनी मुंबईतील टॅक्सी, रिक्षा आणि खासकरुन बेस्ट परिवहनचं कंबरडं मोडलेलं असताना लवकरच शहरातील रस्त्यांवर अॅप नियंत्रित 'एसी' बसही धावणार आहेत. ओला कंपनीने मुंबईत 'एसी' शटल बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या बसमधून प्रवाशांना प्रति किमी 4 रुपयांत प्रवास करता येणार आहे.


अशी करता येईल बुकींग -

ओला अॅपच्या 'शटल' चिन्हावर क्लिक करून प्रवाशांना या बसमध्ये हवं ते सीट बुक करता येईल. यानंतर शटल सेवेचा वेळ, जागेची माहिती प्रवाशांच्या मोबाइलवर येईल. या शटल सेवेत ‌‌वाय-फायची सुविधाही प्रवाशांना मिळेल.


हेही वाचा - मालाडमध्ये ओला कारची तीन गाड्यांना धडक



सकाळच्या वेळेत जादा फेऱ्या -

ऑफिसमध्ये जाणाऱ्या नोकरदारांना समोर ठेऊनच या शटलच्या सेवा सकाळच्या वेळेत ठेवण्यात आल्या आहेत. तर रात्रीच्या वेळेत परतण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात दोन फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यान या बस धावतील. ही शटल सेवा मिरा-भाईंदर ते पवई, भाईंदर-अंधेरी, भाईंदर ते बीकेसी मार्गावर सुरु केली जाईल.


हे देखील वाचा - 'ओला उबेरच्या छताखाली काळी पिवळी टॅक्सी चालणार नाही'



49 रुपयांत कूल-कूल प्रवास -

प्रति किमी 4 रुपये याप्रमाणे या बसचं सुरुवातीचं भाडं 49 रुपये असेल. बेस्टच्या एसी बसच्या तुलनेत हे भाडं अतिशय कमी असल्यानं सहाजिकच आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टपुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. बोरीवली ते ठाण्याच्या एसी बस प्रवासासाठी साधारणत: 60 ते 80 रुपये लागतात. पण ओला शटलचं भाडं अवघं 49 रुपये असेल.


या मार्गांवर धावेल ओला शटल :

मार्ग
 वेळ
भाडे
भाईंदर-पवई
सकाळी 7:30
59 रू.
भाईंदर-ठाणे
सकाळी 7:20
59 रू.
भाईंदर-अंधेरी
सकाळी 7:45
49 रू.
भाईंदर-बीकेसी
सकाळी 7:30
75 रू.
अंधेरी-बीकेसी
सकाळी 8:45
49 रू.
पवई-ठाणे
सकाळी 9:00
49 रू.
बीकेसी-अंधेरी
सायंकाळी 5:30
49 रू.
ठाणे-पवई
रात्री 8:30
59 रू.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा