Advertisement

'ओला उबेरच्या छताखाली काळी पिवळी टॅक्सी चालणार नाही'


'ओला उबेरच्या छताखाली काळी पिवळी टॅक्सी चालणार नाही'
SHARES

सीएसटी - ओला उबेरच्या छताखाली काळी पिवळी टॅक्सी चालणार नसल्याचं जय भगवान महासंघ व ऑल महाराष्ट्र टॅक्सी रिक्षा चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब सानप यांनी स्पष्ट केलंय. मुंख्यमंत्री काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी एक अॅप्लिकेशन तयार करत असल्याची माहितीही सानप यांनी दिली. तसेच ओला टॅक्सी कंपनीने माध्यमांना जे विधान केलं होतं ते साफ चुकीचं असल्याचं सांगत सानप यांनी निषेध व्यक्त केलाय. तसेच काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांनी कोणत्याही भूलथापांना भुलू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुंबई मराठी पत्रकारसंघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा