• मालाडमध्ये ओला कारची तीन गाड्यांना धडक
  • मालाडमध्ये ओला कारची तीन गाड्यांना धडक
SHARE

मालाड - भरधाव वेगाने येणाऱ्या एका ओला कारने तीन गाड्यांना धडक दिल्याची घटना मालाड (प.) इथल्या मालवणीतून समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात काही लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मालवणी गेट क्रमांक आठ येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एका ओला कारने एक रिक्षा, टेम्पो आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला पोलीस ठाण्यात नेले. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या