'सिद्धिविनायक टेंपल' मोबाईल ॲपचं ऑनलाईन उद्घाटन, घरबसल्या घ्या बाप्पाचं दर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कोरोना काळात मंदिरे बंद असल्यानं भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येत नव्हतं. त्यामुळे अनेक भाविक निराश झाले. पण भाविकांच्या सोईसाठी न्यासातर्फे ही विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याच अंतर्गत असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धीविनायक गणपतीचं दर्शन भाविकांना घरबसल्या घेता येणार आहे.

'सिद्धीविनायक टेंपल' या मोबाईल ॲपचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. ‘सिद्धीविनायक टेंपल’ या नावानं असणारं हे ॲप अँड्राईड आणि ॲपलवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ बुक करता येणार आहे. या बुक केलेल्या वेळी भाविकांच्या नावे मंदिराचे पुजारी थेट गाभाऱ्यातून आशिर्वचन करतील.

हेही वाचा : पिंपळेश्वर मित्र मंडळाची कोरोना योद्धांना मानवंदना

याशिवाय ॲपद्वारे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसंच मंदिरातील विविध सण- उत्सवांची अद्यायावत माहिती उपलब्ध होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला सिद्धीविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲङ पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले आदी मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा

कागदी फुलांपासून साकारले लालबागच्या राजाचे मोझॅक पोर्टेट

यंदा गणेशोत्सवात निर्माल्यही ७० टक्क्यांनी कमी

पुढील बातमी
इतर बातम्या