Advertisement

यंदा गणेशोत्सवात निर्माल्यही ७० टक्क्यांनी कमी

कोरोनामुळं गणपती बाप्पाच्या मूर्तीची संख्या घटल्याची माहिती समोर येत आहे.

यंदा गणेशोत्सवात निर्माल्यही ७० टक्क्यांनी कमी
SHARES

कोरोनामुळं यंदा सर्व सण-उत्सवांवर सावट आलं आहे. विशेषत: यंदाच्या गणेशोत्सवावर या कोरोनाचं सावट असल्यानं साधेपणानं उत्सव साजरा केला जात आहे. तसंच, कोरोनामुळं गणपती बाप्पाच्या मूर्तीची संख्या घटल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय, संपूर्ण मुंबईतून मोठ्या प्रमाणात निर्माल्या जमा होतं. मात्र, यंदा निर्माल्याच्याही प्रमाणात घट झाली आहे. निर्माल्य तब्बल ३० टक्क्यांनी कमी झाल्याचं समजतं.

संकलित करण्यात आलेल्या या निर्माल्यापासून खत तयार करून ते महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये उपयोगात आणले जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळं यंदा गणेशोत्सवावर खूप बंधने घालण्यात आली होती. गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं होतं. त्याला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला आहेत.

यंदा कृत्रिम तलावांतील श्रीगणेशमूर्ती विसर्जनात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर निर्माल्याचे प्रमाणही घटल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे. महापालिकेनं विविध ठिकाणी निर्माल्य संकलनांची व्यवस्था दरवर्षीप्रमाणं केली होती.

यामध्ये प्रामुख्यानं निर्माल्य कलशांसह निर्माल्य संकलित करणाऱ्या वाहनांचा समावेश असतो. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान पहिल्या ५ दिवसांत म्हणजेच २२ ते २६ ऑगस्टदरम्यान एकूण १ लाख ३० हजार ३१ किलो एवढे निर्माल्य संकलन झाले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४१ हजार किलो एवढे निर्माल्य संकलन बोरिवली भागातून झाले आहे.

वांद्रे पश्चिम विभागात ११ हजार ६०० किलो आणि परळ-लालबागमध्ये १० हजार किलो एवढे निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. तर याच ५ दिवसांच्या कालावधीदरम्यान सर्वात कमी निर्माल्य संकलन मशीद बंदर, डोंगरी विभागात १९० किलो, वांद्रे पूर्व विभागात ३०० किलो आणि ‘ई’ विभागात ३७० किलो झालं आहे. 



हेही वाचा -

राज्य सरकारनं हिरवा कंदील दिल्यास लोकल होणार सुरू

शहरी आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी आरोग्य संचालक शहरी, या नविन पदाची निर्मिती


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा