प्रकाशाचा उत्सव असलेला सण म्हणजे दिपोत्सव. दिवाळी ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीनिमित्त सगळीकडं दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. घरातील साफसफाईपासून नवीन वस्तू खरेदी करण्यात सगळे व्यस्त असल्याचे दिसत आहे. तसंच, विविध तोरण, रांगोळ्या व आकाशकंदील, पणत्या यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे.
दिवाळीनिमित्त सगळ्यात आधी बाजारात रांगोळी आणि आकाश कंदील विक्रीसाठी वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे आकाश कंदील यंदा बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दादरमधील बाजारपेठेत रहिवाशांनी कंदील आणि रांगोळी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. तसंच दिवाळीला आता केवळ एक आठवडा शिल्लक असल्यानं लोकांनी फराळाच्या तयारीला ही जोरदार सुरूवात केली आहे.
दिवाळीनिमित्त यंदा बाजारात अनेक प्रकारच्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सुंदर नक्षीकाम केलेल्या आणि चमकीदार छोट्या-मोठ्या आकर्षक पणत्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे. या पणत्यांची किंमत १० रुपयांपासून १०० ते १५० रुपयांपर्यंत आहे.
हेही वाचा -
पीएमसी घोटाळा : चेक न वटवताच दिले १०.५ कोटी
आरेच्या मुद्द्यावर आमच्या आमदारबाई मूग गिळून बसल्या, पण मी शेवटपर्यंत लढणार- युवराज मोहिते