राखी, गणेशमूर्ती जीएसटीमुक्त

अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आणि गणेशोत्सव हे सण येऊन ठेपले आहेत.  मुंबईसह राज्यभरात रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच, केंद्र सरकानं खुशखबर दिली आहे. राखी आणि गणेशमुर्तीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) काढून टाकण्याची घोषणा अर्थमंत्री पियूष गोयल यांनी केली आहे.

हस्तशिल्प, हँडलूम्सही करमुक्त

जीएसटी हटवल्याने राखी अाणि गणेशमूर्ती स्वस्त होणार अाहेत. राखी आणि गणेश मुर्तींसह हस्तशिल्प आणि हँडलूम्सलाही जीएसटीतून वगळण्यात आलं आहे. गणेशोत्सव आणि रक्षाबंधन हे आपल्या परंपरेचा भाग असल्यामुळं आपल्याला या सणांचा आदर करायला हवा, असं अर्थमंत्री पियूष गोयल यांनी नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. 


हेही वाचा -

गोविंदांचा विमा १० लाखांचा!

अाता भटजीही मिळवा अाॅनलाइन!


पुढील बातमी
इतर बातम्या