Advertisement

अाता भटजीही मिळवा अाॅनलाइन!


अाता भटजीही मिळवा अाॅनलाइन!
SHARES

गणेश चतुर्थी किवा कोणतंही धार्मिक कार्य असो, घरातील सर्वांची एकद धांदल उडते, ती म्हणजे भटजी मिळवण्याची. साग्रसंगीत पूजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यापासून ते भटजींना बोलावण्यापासून सर्व कामं करताना अक्षरश: सर्वांच्या नाकीनऊ येतात. त्यातच पूजेला येणाऱ्या भटजींचा वेळ, दक्षिणा यांसारख्या गोष्टींचा नाहक त्रासही आपल्याला होत असतो. परंतु हा त्रास कमी करण्यासाठी एका तरुणांनं 'माय ओम नमो' हे अॅप सुरू केलं आहे. या अॅपमुळं आता प्रत्येकाला घरबसल्या ऑनलाईन भटजी बुक करता येणार आहे.


माय नमो अॅप

'माय ओम नमो' या अॅपची सुरुवात जानेवारी २०१७ मध्ये झाली असून त्यात भट बुकिंग, लाइव्ह दर्शन, भजन मंडळ, भविष्य यांसारख्या विविध १८ धार्मिक सेवा उपलब्ध आहेत. हे अॅप गुगल प्ले स्टोअर व आयफोनसाठीही उपलब्ध असून http://www.myomnamo.com या वेबसाईटवर सर्व सेवा उपलब्ध आहेत. सध्या या अॅपमध्ये जवळपास दोन हजार भटजी उपलब्ध आहेत. त्याशिवाय जवळपास १८०० महिला कार्यरत असून त्या पूजेचं साहित्य बनवण्यासाठी मदत करतात.


परदेशवासीयांसाठी उपयुक्त

माय नमो अॅप हे अॅप परदेशातील कुटुंबीयांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार अाहे. आता लोकांना एका क्लिकद्वारे आवडत्या गणपतीसह संपूर्ण गणपती पूजा सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याद्वारे इको-फ्रेंडली गणपती, इको-फ्रेंडली मखर, ब्राह्मण, पूजेचं सर्व साहित्य, फुलं, पत्री, व फळं हे सर्व त्यात उपलब्ध असणार आहे.


दुबईत २५० पूजेचं बुकिंग

यंदा गणेश चतुर्थीसाठी दुबईत २५० पुजा बुक झाल्या असून येत्या गणेश चतुर्थीसाठी २५ ब्राह्मण बुक झाले आहेत. तसचं मुंबईत १२५ बुकिंग झाल्या असून पालघरमध्ये ७५ ब्राह्मणांची बुकिंग झाली आहे. ही सेवा मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरार, नाशिक, पुणे, नागपूर यांसारख्या विविध भागांमध्ये उपलब्ध आहे.


मी दुबईला असताना माझ्या नवीन ऑफिसमध्ये सत्यनारायणाची पूजा करायची होती. परंतु त्यावेळेस ब्राह्मण न मिळाल्यानं मला ही कल्पना सुचली. माय म्हणजे आपुलकीची भावना आणि ओम नमो हा धार्मिक शब्द प्रत्येक ठिकाणी वापरत असल्यानं माय ओम नमो असं नाव आम्ही ठेवलं. येत्या काही दिवसांत यात अॅनिमेशन बटुकद्वारे पंचतंत्र, हनुमानचालिसा, शुभंकरोती यांसारख्या धार्मिक स्तोत्रांचं महत्त्व आम्ही लहान मुलांसह तरुण पिढीलाही पटवून देणार आहोत. यामुळे सध्याची पोकेमॉन, डोरेमॉन बघून बिघडत असणारी मुल काहीशी सुधारतील, अशी इच्छा आहे.
- मकरंद पाटील, माय ओम नमो अॅपचे संस्थापक


हेही वाचा -

मेकिंग वारी ग्लोबल

...तर काॅलेजमध्ये कुराण, बायबलही वाटू - शिक्षणमंत्री



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा