मेकिंग वारी ग्लोबल


  • मेकिंग वारी ग्लोबल
  • मेकिंग वारी ग्लोबल
  • मेकिंग वारी ग्लोबल
  • मेकिंग वारी ग्लोबल
  • मेकिंग वारी ग्लोबल
  • मेकिंग वारी ग्लोबल
SHARE

४०० वर्षांपासून रुढ असलेल्य़ा वारीला वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व अाहे.  महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचा वारी हा पाया असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जावे पंढरीसी, आवडी मनासी म्हणत ती आत्मखूण वारकरी जपतो आहे. भक्ती, श्रद्धा, आस्था आणि निश्चय याही पलीकडे वारीची सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महती आहे. मानवी भावनांचा सामूहीक अविष्कार म्हणजे वारी. माणसाचे माणसाशी रक्तापलीकडचे नेमकं काय नातं आहे? ते वारीतच समजू शकतं. वारीची हीच महती आणि परंपरा जागतिक पातळीवर पोहोचवण्याच्या उद्देशानं मुंबईत राहणाऱ्या वरदा संभूस या तरूणीनं वारीवर पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. वरदाचा हाच शोधनिबंध जर्मनीच्या परिषदेत वरदानं सादर केला. 'मेकिंग वारी ग्लोबल'

जर्मनीतील बर्लिन इथं झालेल्या 'सॅक्रेड जनीर्ज' या तीर्थक्षेत्राविषयक पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वरदानं महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीविषयी आपला शोधनिबंध सादर केला. ५ आणि ६ जुलै दरम्यान अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीच्या युरोप गेटवेतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. 


स्पेन, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, श्रीलंका, नेदरलँड आणि आयरलँड आदी देशांचे ३० संशोधक परिषदेत सहभागी झाले होते.  परिषदेत सहभागी होण्यासाठी १०० अर्ज आले होते. त्यातून २४ देशांमधल्या ३० संशोधकांची निवड झाली. यामध्ये मुंबईच्या वरदा संभूसचा समावेश होता.वारीची महती इंग्रजीत

आत्तापर्यंत वारीसंदर्भात अनेक मराठी साहित्यिकांनी मराठीत खूप काही लिहिलं आहे. मराठीच्या तुलनेत इंग्रजीमध्ये वारीचा संशोधनात्मक विचार कमी झाला आहे. त्यामुळे काही तुरळक अपवाद वगळता सहाजिकच विश्लेषणाच्या अंगानं आंतरराष्ट्रीय स्तरावर वारी आणि वारकरी सांप्रदायाचं तत्वज्ञान कमी प्रमाणात पोहोचलं आहे. त्यामुळे वरदानं इंग्रजी भाषेत हे संशोधन करण्याचा निर्णय घेतला. तिची पीएचडी देखील इंग्रजी भाषेतच आहे. विठ्ठल आणि वारकऱ्यांमधील भावबंध, ज्ञानोबा-तुकाराम-माऊलीचा गजर करताना त्या मागची काय भावना आहे?, ज्ञानोबा-तुकारामांचं तत्वज्ञान, वारीतील व्यवस्थापन, वारकऱ्यांच्या शिस्तबद्ध दिंड्या, अभंग, भारुडे, प्रवचन अादी वारीचे पैलू इंग्रजीत मांडण्यात येणार आहेत. जेणेकरून जगाच्या व्यासपीठावर वारीची महती पोहोचेल.


पुण्यात एका मराठी कुटुंबामध्ये मी लहानाची मोठी झाली. त्यामुळे लहानपणापासून मी वारी पाहत आली आहे. लहान असताना मला प्रश्न पडायचा की, वारी नेमकी काय? हे लोकं एवढं चालू कसं शकतात? एवढी शक्ती त्यांच्यात येते तरी कुठून? असे अनेक प्रश्न मला पडायचे. त्यामुळे लहानपणापासूनच मला वारीविषयी कुतुहूल होतं. राज्यशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दाखल झाले. तेव्हा मी महाराष्ट्राला लाभलेल्या या परंपरेच्या संस्कृतीवर संशोधन करण्याचा निर्णय घेतला.

- वरदा संभूस८ वर्षांपासून संशोधन

वरदानं २०११ पासून वारीवर संशोधन करायला सुरुवात केली. वरदाच्या म्हणण्यानुसार अध्यात्मिक, धार्मिक दृष्टीकोनातून वारीकडे पाहिलं जातं. पण वारी आणि वारकरी सांप्रदाय या दोघांना सामाजीक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तितकंच महत्त्व आहे. मुळात वरदा राज्यशास्त्राची विद्यार्थीनी असल्यामुळे तिच्या संशोधनात वारीचा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या काय प्रभाव आहे? हे वाचायला मिळणार आहे.लवकरच वरदाचं हे संशोधन पूर्ण होईल. या संशोधनामार्फत 'मेकिंग वारी ग्लोबल' हा वरदाचा ध्यास लवकरच पूर्ण होईल.


हेही वाचा - 

मुंबईतलं 'पंढरपूर'!
संबंधित विषय
ताज्या बातम्या