Advertisement

...तर काॅलेजमध्ये कुराण, बायबलही वाटू - शिक्षणमंत्री


...तर काॅलेजमध्ये कुराण, बायबलही वाटू - शिक्षणमंत्री
SHARES

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचं वाटप करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

याबाबत तावडे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी विचारसरणीचे आमदार याबाबत चुकीचा प्रचार करत अाहेत. भगवद्गीता वाईट आहे आणि त्याचं वाटप करु नये, असं त्यांनी जाहीर करावं. तसंच जर येत्या काही दिवसात कुराण व बायबलचं वाटप करा, अशी मागणी झाली तर त्याचीही परवानगी देऊ.


नेमकं प्रकरण काय

बुधवारी ११ जुलै २०१८ ला उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी मुंबईतील नॅककडून अ किंवा अ + श्रेणी प्राप्त झालेल्या सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयात भगवद्गीता वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतच एक परिपत्रकही सरकारनं काढल होतं. या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचं वाचन करावं या उद्देशानं नॅकचे मुल्यांकनप्राप्त अ आणि अ+ श्रेणी प्राप्त १०० महाविद्यालयामध्ये भगवद्गीता संचाचे वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलं. हे वाटप संचालनालयाच्या माध्यमातून केलं जाणार असून संबंधीत महाविद्यालयांनी हे संच घेऊन जावेत, असे आदेशही उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी दिले आहेत.


विद्यार्थी संघटनांचा विरोध

या निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले अाहे. भगवद्गीतेचे धडे देवून शिक्षण संचालकांना काय सिद्ध करायचे आहे, हा प्रश्न आता विचारला जात आहे. विशेष म्हणजे सरकारच्या या निर्णयाला विविध द्यार्थी संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. लहानपणापासून शाळेच्या पुस्तकावरील पहिल्या पानावरील संविधानात धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला गेला आहे. असं असतानाही एका विशिष्ट धर्माच्या पुस्तकाचं वाटप करणं योग्य नव्हे. बायबल, कुराण, बुद्ध, जैन यांसारख्या सर्व धर्मांच्या पुस्तकांचं वाटप करून सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व धर्म समजू द्या, आपला देश कसा विविधतेने नटलेला आहे हे लोकांना समजू द्या, अंस मत विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केलं आहे.


भक्ती वेदांत संस्थेद्वारे वाटप

विनोद तावडे म्हणाले की, भगवद्गीतेचं वाटप सरकारतर्फे करण्यात येत नसून भिवंडीच्या भक्ती वेदांत संस्थेद्वारे हे वाटप करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी ही संस्था आमच्याकडे भगवद्गीतेचं वाटप करावं, अशी मागणी घेऊन आली होती. त्या संस्थेचा भगवद्गीता मोफत वाटप करण्याचा प्रस्ताव होता.

 परंतू शासनानं भगवद्गीतेचे मोफत संच हे शासनातर्फे नव्हेत तर त्या संस्थेमार्फतच द्यावेत असं स्पष्ट केलं आहे. त्याशिवाय भगवद्गीतेचं संच महाविद्यालयात वाटप करण्याबाबत कोणतंही परिपत्रक अथवा आदेश शासनानं दिले नसून केवळ महाविद्यालयांची यादी भक्ती वेदांत संस्थेला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीनुसार संस्थेकडून महाविद्यालयांना भगवद्गीता संचाचं मोफत वाटप करण्यात येणार आहे.


भीम आर्मीचा विरोध

मुंबईतील शाळा महाविद्यालयांमध्ये भगवद्गीता वाटण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने प्रखर विरोध केला आहे. भारतातील विद्यार्थ्यांना धार्मिक ज्ञानाची गरज नसून देश अखंड ठेवणाऱ्या भारतीय संविधानाच्या ज्ञानाची गरज असल्याने भगवत गीतेएवजी भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमाचा समावेश करून संविधानाचे त्यांना वाटप करण्यात यावे, अशी मागणी या संघटनेचे प्रदेश प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व कुलगुरूंना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.


बायबल वाटण्यास परवानगी मागितली

अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघातर्फे महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयात बायबल विद्यार्थ्यांना मोफत वाटण्याची परवानगी मिळण्याबाबत सरकारला विनंती करण्यात आली आहे. शासनाने भगवद्गीता वाटण्याचा घेतलेला निर्णय चांगला असून त्याचं आम्ही स्वागत करतो. त्याशिवाय नुकतंच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोणतीही संस्था बायबलच मोफत वाटप करणार असेल तर आम्ही त्याला परवानगी देऊ असं सांगितल होतं. त्यानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोफत बायबल  देण्यास तयार असून त्याबाबतची रितसर परवानगी शासनाने द्यावी असं ख्रिश्चन महासंघानं म्हटलं अाहे.

भगवद्गीता वाटण्याचा निर्णय सरकारनं घेतला कसा? भगवद्गीता वाटण्याच कारण काय ? सरकारला आहे तो अभ्यासक्रम नीट शिकवता येत नाही. विद्यापीठाचा कारभार नीट चालवता येत नाही. सध्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडालेला असताना सरकार अशा वादग्रस्त गोष्टी मुद्दाम करत आहे. सरकारने शिक्षणाच्या भगवीकरणाचा प्रयत्न करण्यापेक्षा शिक्षण क्षेत्र सुधारावं. आम्ही भगवद्गीतेच्या विरोधात नाही. मात्र कॉलेजमध्ये ती वाटण्याची आवश्यकता नव्हती. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा.
– जयंत पाटील, आमदार



शिक्षण विभागाचं संघीकरण करण्याचा या सरकारचा प्रयत्न दिल्लीपासून मुंबईपर्यंत सुरू आहे. आपलं राज्य व देश हा धर्मनिरपेक्ष देश असून भगवद्गीतेचं वाटप करण्यापेक्षा संविधानाचं वाटप केलं असतं तर समजू शकलो असतो. जर धर्माचा अभ्यास करायचा असेल तर सर्व धर्मांच्या ग्रंथाचं वाटप करा. शिक्षणमंत्र्यांनी अशाप्रकारे एका ठरावीक धर्माचे ग्रंथ वाटप करण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा सुधारावा.
- कपिल पाटील, अामदार



हेही वाचा -

अकरावीच्या पहिल्या फेरीत ५० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

आता काॅलेजांमध्ये वाटणार भगवद्गीता!



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा