लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलत आहे. गणेशोत्सवात सगळ्यात मोठा झालेला बदल म्हणजे गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसचा झालेला व्यापक शिरकाव. पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, सजावटीकरिता प्लास्टिकचा वापर, थर्माकोलसारख्या विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर, जास्त घातक रासायनिक रंगाचा वापर, गुलालाची अतिरेकी उधळण, या सर्वामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.
आज आम्ही तुम्हाला इकोफ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक अशा ५ गणेश मूर्तींची माहिती देणार आहोत. जेणेकरून यावर्षी तरी मुंबईकर पर्यावरणपूरक गणपती घरात स्थापन करतील. या गणपती मूर्तींचे विसर्जन देखील घरच्या घरी करू शकतील.
१) फिशफूड गणपती
प्लास्टर ऑफ पॅरिस'पासून (पीओपी) तयार केलेली गणेशमूर्ती पर्यावरणास हानीकारक असतात. त्यातुलनेत शाडू पर्यावरणपूरक समजली जाते. परंतु शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचं विघटन झाल्यानंतरही अनेकदा त्यावरील कृत्रिम रंगाचा समुद्रातील जीवांना त्रास होतो. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून मुंबईतल्या 'स्प्राऊट' या संस्थेनं पूर्णपणे पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार केली आहे. एवढंच नव्हे, तर गणेशमूर्तीचं विघटन झाल्यानंतर ती माशांच्याही कामी येणार आहे.
साच्याच्या साहाय्यानं शाडूच्या मातीची सुबक मूर्ती तयार केली जाते. त्यानंतर मूर्तीवर कोरीवकाम केलं जातं. सर्वप्रथम मूर्तीला पांढऱ्या रंगाचा थर देऊन तिला उन्हात सुकवल्यानंतर इतर रंगांनी सजवलं जातं. हळद, चंदन, मुलतानी माती आणि गेरू या चार गोष्टींचा आणि रंगांचा वापर केला जातो. मूर्ती बनवताना त्यात माशांसाठी खास बनवण्यात आलेले अन्न टाकले जाते. जेव्हा गणपतीचे विसर्जन होते तेव्हा माशांना खाद्य मिळतं.
पत्ता :६८/४ तरूण भारत सोसायटी, चकाला, शहर रोड, अंधेरी (प.)
संपर्क : ९८२०१४०२५४
ईमेल : sproutsonline@gmail.com
शाडू आणि पेपरच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्यात येतात. पण त्याला आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे तो म्हणजे गाईच्या शेणापासून बनवलेली गणपतीची मूर्ती.
ऑर्डर करण्यासाठी वेबसाईट : http://www.ecoganeshidol.com/
संपर्क : ९५६१००८२२५
ट्री गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे, गणेशमूर्ती लाल माती आणि खतापासून बनवली जाते. या मूर्ती घडवताना त्यात भेंडीच्या बिया पेरल्या जातात. लाल मातीच्या या गणेशाला गेरुचा लाल रंग देऊन फिनिशिंग केले जाते. त्यानंतर ही मूर्ती कुंडीच्या आकाराच्या 'ट्रे'मध्ये ठेवली जाते. दीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस मूर्तीची पूजा केली जाते. शेवटच्या दिवशी घरातल्या टपातच तुम्ही मूर्तीचं विसर्जन करू शकता. लाल माती असल्याने मूर्ती लगेच पाण्यात विरघळते.
विरघळलेली माती तुम्ही कुंडीत टाकू शकता. दोन आठवड्यांनंतर बियांना अंकुर फुटतो आणि त्याचे रोपटे होते. अशाप्रकारे बाप्पा विसर्जनानंतर एका रोपट्याच्या माध्यमातून तुमच्यासोबतच असतो. दत्तारी कोथूर या तरूणाची ही संकल्पना आहे. ९ इंचापासून ते १८ इंचापर्यंतच्या ट्री गणेशा आहेत. ज्यांची किंमत २२०० ते ४५०० हजार रूपयांपर्यंत आहे.
कुठे : २८६/३९, बंसिंगर चाळ, जी. के. मार्ग, लोअर परेल
संपर्क : ९८१९३४९३९३
इमेल : info@treeganesha.com
४) चॉकलेटचा गणपती
मुंबईत राहणारी रींतू राठोड दरवर्षी चॉकलेटचा गणपती साकारते. गेल्यावर्षी त्यांनी ३५ किलोचा बाप्पा साकारला होता. या चॉकलेटच्या बाप्पाचं घरच्या घरी दुधात विसर्जन त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी हे दुध प्रसाद म्हणून गरीब मुलांमध्ये वाटलं होतं.
तुम्ही घरच्या घरी चॉकलेटचा गणपती बनवू शकता. कसा बनवायचा हे तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. शेफ वरूण इनामदार हे तुम्हाला कसा बनवायचा हे दाखवत आहेत.
घरी करण शक्य नसेल तर https://www.jaypore.com/silver-choco-plated-lord-ganesha-l6cm-w45cm-h65cm-brass-p476359 इथं ऑर्डर करू शकता.
माती, मुलतानी माती, गेरू आणि हळद यांचा वापर करून इकोएक्जिस्ट ही संस्था गणेश मूर्ती बनवते. गणेश मूर्ती उन्हात सुकवल्या असल्यामुळे विसर्जनादरम्यान पाण्यात सहज विरघळतात. २ ते २३ इंच उंच अशा गणेश मूर्ती इथं उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांनी समुद्र किनारी निर्माल्य कलशची सोयदेखील केली आहे. या निर्माल्यापासून ते होळीचे रंग तयार करतात.
कुठे : बी-१७/७०१, सिद्धांचल फेज ३, वसंत विहार हाइट स्कूल, ठाणे (पू.)
संपर्क : ९५६१००८२२५
हेही वाचा