गणेशोत्सव २०१९ : बाप्पाला 'कॅनव्हास'ची सजावट

गणेश सजावटीसाठी कॅनव्हास फ्रेमच्या माध्यमातून एक नवा पर्याय गणेश भक्तांसाठी तेजस लोखंडे यांनी उपलब्ध करून दिला आहे.

  • गणेशोत्सव २०१९ : बाप्पाला 'कॅनव्हास'ची सजावट
  • गणेशोत्सव २०१९ : बाप्पाला 'कॅनव्हास'ची सजावट
SHARE

पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी थर्माकोलवर बंदी आणण्यात आली. थर्माकोल बंदीनंतर गणेशोत्सवात डेकोरेशन कशाचे करायचे? हा प्रश्न गणेशभक्तांसमोर उभा राहिला. मात्र यावर व्यवसायानं डॉक्टर असलेल्या तेजस लोखंडे यांनी एक भन्नाट संकल्पना आणली आहे. गणेश सजावटीसाठी कॅनव्हास फ्रेमच्या माध्यमातून एक नवा पर्याय गणेश भक्तांसाठी तेजस लोखंडे यांनी उपलब्ध करून दिला आहे.

स्वास्थ्यरंग संस्थेकडून गणेश मूर्तीच्या संकल्पनेनुसार हव्या त्या आकारात फ्रेम बनवून देण्यात येतात. या फ्रेम अतिशय साध्या, सोबर आणि आकर्षक आहेत. याशिवाय बाप्पाच्या विसर्जनानंतर या फ्रेम टाकून देण्याची गरज नाही. त्या तुम्ही पुढच्यावर्षी देखील वापरू शकता. नाहीतर घराच्या भिंतीवरही लावू शकता. दोन प्रकारे याचा वापर तुम्हाला करता येऊ शकतो.गणेशगल्लीत यंदा पाहायला मिळणार राम मंदिराची प्रतिकृती


तेजस लोखंडे हे आयुर्वेदिक डॉक्टर असल्यानं निसर्ग आणि त्यांचं जवळचं नातं आहे. तेजस यांना रांगोळी काढण्याची प्रचंड आवड आहे. स्वत:ची आवड जोपासण्यासाठी त्यांनी स्वास्थ्यरंग परिवाराची निर्मिती केली. पर्यावरण स्नेही सजावट करण्यासाठी 2008 साली तेजस यांनी कपड्याच्या प्रकारात मोडणाऱ्या कॅनव्हासवर कॅलिग्राफी आणि लाकूड यांची सांगड जमवत फ्रेम तयार केली. अशा फ्रेम २०१७ पासून त्यांनी लोकांपर्यत पोहोचवण्यास सुरुवात केली. एक फ्रेम बनवण्यासाठी दोन दिवस जातात.


 

सजावटीसाठी वेळ मिळत नसलेल्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. गणेश विसर्जन झाल्यानंतर ही फ्रेम टाकून देणे किंवा माळ्यावर ठेवण्याचाही प्रश्न नाही. कापडानं बनवलेली फ्रेम घरच्या भिंतीवर लावून घराची शोभा वाढवता येऊ शकते. तसेच ही फ्रेम १० वर्षांपेक्षाही जास्त काळ टिकू शकते.

तेजस लोखंडे, संस्थापक, स्वास्थरंग

तुम्हाला पण हवी आहे का अशीच एक सुंदर कॅनव्हास फ्रेम जी गणपतीमध्ये सजावट म्हणून वापरता येईल आणि बाप्पाला निरोप दिल्यानंतर सुद्धा ती तुमच्या घराच्या भिंतीला शोभा देईल. मग तेजस लोखंडे यांना संपर्क करा आणि इकोफ्रेंडली सजावटीचा आनंद घ्या. ऑर्डन देण्यासाठी १५ ऑगस्ट हा शेवटचा दिवस तुमच्याकडे आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता या 9773267001 नंबरवर संपर्क करून ऑर्डर द्या.हेही वाचा

गणेशोत्सव २०१९ : 'या' दिवशी होणार तुमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन
संबंधित विषय
ताज्या बातम्या