गर्दी टाळण्यासाठी माहीम दर्गा भाविकांना देणार पास

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

महाराष्ट्र सरकारनं प्रार्थनास्थळं पुन्हा सुरू करण्यास नुकतीच परवानगी दिली. परवानगी मिळताच मुंबईच्या प्रसिद्ध माहीम दर्गा इथं भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. पण अधिक गर्दी पाहता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी दर्गाकडून पास देण्यात येऊ शकतात.

सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात आली. मार्चपासून धार्मिक स्थळं बंद झाली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठिंबा दर्शवलेल्या विरोधी पक्षाच्या जोरदार दबावामुळे अखेर मंदिरे पुन्हा सुरू झाली.

अलीकडील घडामोडींमध्ये शिर्डीतील साई बाबा मंदिरात प्रचंड गर्दी झाली. तथापि, मुंबई शहरातील सिद्धिविनायक इथं परिसर तुलनेनं गर्दीमुक्त होता. कारण केवळ क्यूआर कोड किंवा ऑफलाइन पास असलेल्या लोकांना संकुलामध्ये प्रवेश देण्यात आला होता.

याव्यतिरिक्त, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरात पूजा करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं भाविकांना फुले, पूजा सामुग्री, प्रसाद घेऊन जाण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे मंदिरातील भाविकांना कोणत्याही प्रकारचा नैवेद्य दाखवता येणार नाही.


हेही वाचा

छठ पूजेसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

पर्यावरणपूरक शेणाचे दिवे 'असे' बनतात, जाणून घ्या त्याचे फायदे

पुढील बातमी
इतर बातम्या