दादर मार्केटमध्ये गरब्यासाठी खास राजस्थानी घागरा चोली

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

सण उत्सवाच्या निमित्ताने मुंबईकर दादरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नेहमीच गर्दी करतात. आता तर नवरात्रोत्सव जवळ येत आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात नऊ रंगांच्या साड्या हे नोकरदार महिलांचे विशेष आकर्षण असते. या साड्यांसाठी असो वा गरबा खेळण्यासाठी लागणाऱ्या घागरा चोलीसाठी असो सध्या तरूणींच्या नजरा डिझायनर कपड्यांचा शोध घेत आहेत.

ठिकठिकाणी घागरा चोलीचे स्टॉल

यंदा दादरच्या बाजारपेठेत राजस्थानमधून आणलेल्या घागरा चोली विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. येथे ठिकठिकाणी या घागरा चोली विकण्यासाठी विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. यामध्ये 5 वर्षांच्या मुलीपासून ते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणी तसेच महिलांसाठी 200 रुपये ते 5000 रुपयांची घागरा चोली उपलब्ध आहेत. विविध रंग संगती आणि डिझाइन खडे, मणी भरतकाम असलेल्या घागरा चोली सध्या दादर मार्केटमध्ये पहायला मिळत आहेत.

मी या ठिकाणी गेल्या 5 वर्षांपासून राजस्थान वरून घागरा चोली आणतो. तरुणींचा खरेदीसाठी विशेष प्रतिसाद असतो. दरवर्षी रंग तेच असतात मात्र डिझाईन थोड्या फार वेगवेगळ्या आणण्याचा प्रयत्न करतो.

- धीरज मिश्रा, व्यापारी

दादर मुख्य मार्केट असल्यामुळे या ठिकाणी उच्चभ्रू तसेच मध्यम वर्गीय लोक देखील खरेदीसाठी येतात. त्यामुळे दर्जा बरोबरच किंमतीचा देखील विचार करावा लागतो. स्वस्त महाग सर्व प्रकारचे कपडे या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत, असेही धीरज मिश्रा या व्यापाऱ्याने सांगितले.


हेही वाचा - 

दादरमध्ये दुर्गा देवीच्या मूर्तींना दिला जातोय 'फिनिशिंग टच'

नवरात्रोत्सवात बना 'स्टाईल आयकाॅन', हे पोषाख करा 'ट्राय'!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या