Advertisement

नवरात्रोत्सवात बना 'स्टाईल आयकाॅन', हे पोषाख करा 'ट्राय'!


नवरात्रोत्सवात बना 'स्टाईल आयकाॅन', हे पोषाख करा 'ट्राय'!
SHARES

भरजरी 'चनिया चोली' घालू की, आरशांनी सजवलेला 'घागरा' घालू. झगमगीत पेहरावाऐवजी साधे, पण जरा हटके कपडे का घालू नको? जेणेकरून मी सगळ्यांमध्ये उठून दिसेल, सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळतील. पण नेमकं घालू तरी काय? असा प्रश्न तुमच्यांपैकी कित्येकांना पडला असेल. खासकरून तरूणांना. कारण नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.


सौजन्य

नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांची सर्वचजण अगदी आतुरतेने वाट पहात असतात. त्यातही तरूणांना उत्सुकता असते ती ९ दिवस रंगणाऱ्या गरब्याची. 'रंगीलो मारो घागरो', 'ढोल बाजे' अशा अनेक गाण्यांवर तरूणाई थिरकायला सज्ज असते. उत्साहाचा एक वेगळा माहोल नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये पाहायला मिळतो. याशिवाय आगळ्यावेगळ्या फॅशनची झलकही यानिमित्तानं अनुभवायला मिळते. सण कुठलाही असो, 'फॅशन तो बनती है ना बॉस', असा तरुणाईचा मूलमंत्र आहे. त्यामुळे यावर्षी नवरात्रीत काय आणि कशी फॅशन कराल? यावर्षी काही हटके करता येईल का? यावर एक नजर टाकूयात...


घेरदार घागरो , लच्चेदार चुनरी

दांडियासाठी घेरदार घागरा-चोली आणि लच्चेदार चुनरी या पेहरावाला तरूणी प्राधान्य देतात. घागरा-चोलीवर बांधणी प्रिंट, त्यावर अबला वर्कचे भरगच्च भरतकाम. त्यामुळेच घागरा चोलीचा हा साज तरूणींमध्ये लोकप्रिय आहे. घागऱ्यांमध्ये राजस्थानी, बांधणी प्रिंटचा वापर केला जातो. एवढंच नाही तर घागऱ्याला कवड्या, कच्छी वर्क, आरसे, मोती लावून सजवले जाते. त्यामुळे कॉलेज तरूणींमध्ये तर घागरा-चोलीची प्रचंड क्रेझ आहे. फक्त घागरेच नाही, तर चोलीमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. हल्ली बॅकलेस चोलीची जास्त चलती आहे. यासोबतच बाजारात स्लिव्ह्जलेस आणि डिप यू नेक अशा चोलीसुद्धा उपलब्ध आहेत. १५०० पासून ते ४००० हजारापर्यंत किमतीच्या घागरा-चोली बाजारात उपलब्ध आहेत.



कॉन्ट्रास ट्रेंडची चलती

तुम्हाला जास्त 'तामझाम' नको असेल, साधा पेहराव करायचा असेल तर तुम्ही कॉन्ट्रास कपडे आपण निवडू शकता. सिंपल प्रिंट वर्क असलेला घेरदार स्कर्ट, उठून दिसेल असे हँडप्रिटचे टँक टॉप, त्यावर मिरर जॅकेट आणि साधी प्रिटेंड ओढणी हा कॉन्ट्रास पेहराव तुम्हाला हटके लूक देऊ शकतो. स्कर्ट्सवर टॉप नसेल घालायचा, तर तुम्ही लाँग कुर्ती घेऊ शकता. त्यावर तुम्ही मिरर जॅकेट किंवा एखादी बांधणीची ओढणी घेतली तरी उठून दिसेल. बाजारात ६०० ते १५०० पर्यंत वेगवेगळ्या रंगाचे स्कर्ट्स उपलब्ध आहेत.  


रोजच्या वापरातल्या पोषाखाला पसंती

नोकरी, कॉलेज अशा ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिला पारंपरिक पोषाखापेक्षा रोजच्या वापरातल्या पोषाखाला पसंती देतात. लाल, पिवळा, निळा अशा गडद रंगाचे कुर्ते, त्यावर आरक्षाचे नक्षीकाम असा सोबर पेहरावही तरूणींच्या पसंतीस उतरत आहे. २०० रुपयांपासून या कुर्त्यांच्या किंमत सुरू होतात. हे पेहराव जास्त खर्चिक नसल्याने साध्या कुर्त्याला देखील प्रचंड मागणी आहे


जीन्ससोबत हटके फॅशन

  • स्कर्ट्स घालायचा नसेल, तर तुमच्याकडे जीन्सचा देखील पर्याय आहे
  • जीन्सवर क्रॉपटॉप आणि त्यावर बांधणी प्रिंटच्या ओढणीला पेअरअप करू शकता
  • यात ओढणीला साडीसारखे घालून यावर हेवी सिल्वर मेटल कंबर पट्टा आणि नेकलेस पेयर करू शकता.
  • जीन्सवर एखादी कुर्ती घालून त्यावर बेल्ट पेअरअप करता येईल.




  • जीन्सवर क्रॉपटॉप नसेल घालायचा तर चोलीवर तुम्ही कमरबंध पेअरअप करू शकता.
  • ज्याप्रकारे स्कर्टवर टँक टॉप वारले जातात तसेच टँक टॉप तुम्ही जीन्सवर देखील घालू शकता.  
  • यावर तुम्ही एखादे लाँग किंवा शॉर्ट हेवी वर्कचे जॅकेट घालू शकता.


प्लाजोला देखील तरूणींची पसंती

  • सुटसुटीत आणि सोयीस्कर असा पोषाख करायचा असेल, तर तुम्ही जीन्सएेवजी पायघोळ रंगीत प्लाजोचा वापर करू शकता.
  • त्यावर एखादे क्रॉपटॉप आणि बांधणी दुपट्टा पेअरअप करू शकता.
  • प्लाजोवर तुम्ही डेनिम शर्ट घालू शकता
  • त्यावर फुलकारी दुपट्ट्यापासून तयार केलेले जॅकेट पेअरअप करू शकता.
  • प्लाजो आणि त्यावर अनारकली ड्रेस हे सुद्धा एक हटके कॉमबिनेशन आहे
  • यावर तुम्ही हेवी वर्क जॅकेट ट्राय करू शकता.
  • पटियाला सलवार त्यावर एक शर्ट किंवा शॉर्ट कुर्ता आणि मेटल बेल्ट हा देखील एक पर्याय आहे.


सौजन्य

तरूणांसाठीही हटके पर्याय

मुलींप्रमाणे मुलंही नवरात्रोत्सवात आपली फॅशनची हौस भागवून घेतात. पण मुलांसाठी कमी पर्याय बाजारात उपलब्ध असतात. प्रिंटेड केडियू म्हणजे रेडिमेड पायजमा, घेरदार शॉर्ट कुर्ता आणि टरबन असा पेहराव तरूण घालू शकतात. याशिवाय धोती त्यावर आखूड बिनबाह्याची बंडी आणि डोक्याला गुजराथी स्टाइलचा फेटा असा पारंपारिक पेहरावही तरूणांसाठी बाजारात उपलब्ध आहे. सिंपल पेहराव हवा असेल तर जीन्स त्यावर एखादा लांब किंवा शॉर्ट कुर्ता घालू शकता.


अशी ज्वेलरी वापरता येईल

रंगीबीरंगी पोषाखासोबत ज्वेलरीही हटके ट्राय करा. बाजूबंद, चाबीका गुच्छा, मांगटिक्का, हातफुल, झांजर, पायातले वाळे हे नक्कीच वापरून पाहा. यासोबतच स्टोन नेकपीस, काचेच्या बांगड्यांचा देखील वापर तुम्ही करू शकता. पण तुमच्या पेहरावास शोभून दिसतील अशी ज्वेलरी खरेदी करणे आवश्यक आहे.


  • तुम्ही साधा कुर्ता घालणार असाल तर त्यावर ऑक्साईडचा हार आणि कडा घालू शकता.
  • स्टोनने बनवलेले नेकलेसची सुद्धा बाजारात चलती आहे.
  • ड्रेस जर भरगच्च नक्षीकाम असेल तर खूफ वर्क असलेले दागिने घालणे टाळा
  • भरगच्च ड्रेसवर मॅचिंग झुमके आणि हातात बारीकसा कडा घातला तरी छान दिसेल.
  • जीन्स, प्लाजो आणि टॉप या पोषाखावर तुम्ही निऑन कलरचे खडे आणि त्याला गोल्डन कलरची कडा असलेला नेकलेस घालू शकता
  • यामुळे तुम्हाला फंकी आणि ट्रेडिशनल लूक मिळेल.  


मग आता वाट कसली पाहताय? काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा आणि नवरात्रीत हटके पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घ्या.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा