पर्युषण काळात मुंबईतील जैन मंदिरं उघडणार, सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

जैन धर्मियांच्या पर्युषणासाठी २२ आणि २३ ऑगस्टला मुंबईतील दादर, भायखळा, चेंबूर येथील जैन मंदिरे खुली ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. येथील ३ मंदिरे सोडून अन्य कोणतीही मंदिरे प्रार्थनेसाठी उघडण्यात येणार नाहीत.  कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रत्येक सणासाठी सरकारकडून नियमावली ठरवली जात आहे.

कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वालाही सुरूवात झाली आहे. जैन धर्मियांची मंदिरं उघडण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मुंबईतील तीन ठिकाणी जैन मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं हा निर्णय दिला. न्यायालयानं मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरं प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी दिली आहे. पर्युषण पर्वाच्या अखेरचे दोन दिवस म्हणजे २२ व २३ ऑगस्टला मंदिरं उघडण्यात येणार आहे. 

हा आदेश देताना न्यायालयानं म्हटलं की, ही सवलत इतर मंदिरं खुली करण्यासाठी वा मोठी गर्दी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी देता येणार नाही.


हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो

बेस्टच्या १,५६६ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात


पुढील बातमी
इतर बातम्या