Advertisement

बेस्टच्या १,५६६ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या बेस्टच्या १,५६६ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

बेस्टच्या १,५६६ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविण्यासाठी बेस्टचे अनेक कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होते. मात्र, कोरोनानं सर्वांनाच घेरलं आहे. परंतु, या कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. अशातच कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या बेस्टच्या १,५६६ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाविरोधात लढणाऱ्या बेस्ट कामगारांमध्ये मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत १,७८२ कामगार बाधित झाले असून, त्यापैकी १,५६६ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात बेस्ट उपक्रमानुसार, २७ कामगारांचा करोनाने मृत्यू ओढवला आहे. बेस्ट उपक्रमानं कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार केला आहे.

बेस्ट उपक्रमातील आतापर्यंत १,७८२ कर्मचाऱ्यांना लागण झाली असून, त्यातील ८० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये सौम्य आणि अतिसौम्य लक्षणं आढळली आहे. साधारण, १५ टक्के कामगारांना सौम्यपेक्षा थोडी अधिक लक्षणं आहेत. तर ८९ कर्मचाऱ्यांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं असून, त्यातील २२ जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळते.

१,४२६ जणांना अतिसौम्य ते सौम्य लक्षणं असून त्यापैकी ९३ टक्के कर्मचारी कोरोनामुक्त झाले. तर, सौम्यपेक्षा अधिक स्तरावर लक्षणे असलेल्या कामगारांची संख्या २६७ असून, त्यापैकी काही कामगारांना ऑक्सीजन पुरवावा लागला. या घटकांतही कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ८६ टक्के एवढं आहे.हेही वाचा -

मुंबईत क्वारंटाईनचे नियम बदलले, 'हा' आहे नवीन नियम

महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिलं कोविड सेंटरचं काम, मनसेचा आरोपसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा