वाईन अॅण्ड डाईन! वाईन इज शाईन!

बीअर आणि दारूच्या जगात आजही वाईननं आपलं नावीन्य हरवलेलं नाही. एका ग्रीक कवीनुसार वाईन मनाचा आरसा आहे. मुंबईतल्या अनेक रेस्टॉरंट्समध्ये वाईन अॅण्ड डाईन ही संस्कृती हळूहळू रुजू लागली आहे. त्यापैकीच एक नुकतेच सुरू झालेले रेस्टॉरंट म्हणजे '२६६ – द वाईन रूम अॅण्ड बार'.

 

वाईन प्रेमींसाठी पर्वणी!

शेफ साहिल अरोरा आणि रिद्धी मर्चंट यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलं. हे रेस्टॉरंट म्हणजे वाईन प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. शेफ साहिलनं भारतीय पदार्थांचा विचार करूनच इथला मेन्यू तयार केला आहे. या मेन्यूमध्ये भारतीय पद्धतीनं बनवलेल्या पदार्थांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे पदार्थ विदेशी असले तरी त्यांना देसी तडका देण्यात आला आहे. कॅरेमलाइज्ड फिग सलाड, कप्रीज सलाड, लोटस स्टीम क्रिस्प, चिकन टू वेझब्रेज्ड लॅम्ब स्नॅक्स असे अनेक पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता.

वाईन संस्कृती भारतात रुजावी हा '२६६ – द वाईन रूम अॅण्ड बार' सुरू करण्यामागचा खरा उद्देश आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, न्यूझिलंड, फ्रान्स, अर्जेंटिना, स्पेन आणि पोर्तुगाल इथल्या वाईनचा आस्वाद तुम्हाला '२६६ – द वाईन रूम अॅण्ड बार'मध्ये घेता येणार आहे. हे रेस्टॉरंट इतकं सुंदर सजवण्यात आलं आहे, की तुम्ही रेस्टॉरंटच्या प्रेमात पडाल! तुम्ही डेटवर जात असाल, तर इथं प्रायव्हेट बूथची व्यवस्था देखील केली आहे. वाईन संपली की तुमची बॉटल तुम्ही वाईन क्रॉक बॉक्समध्ये ठेवू शकता.

वेळ - दुपारी १२ ते ३ आणि संध्याकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत

संपर्क नंबर - ८८७९१०१३५०

पत्ता - २६६ लिंकींग रोड, शॉपर स्टॉपच्या पुढे, वांद्रे (.)


हेही वाचा

वाईनचे ३०० प्रकार आणि सोबत क्रॅब पकोडा!

पुढील बातमी
इतर बातम्या