Advertisement

मुंबईत इथे मिळेल स्पेशल बीअर ट्रीट!


मुंबईत इथे मिळेल स्पेशल बीअर ट्रीट!
SHARES
Advertisement

उन्हाळा जसजसा वाढू लागतो, तसतशी जिवाची काहिली होते. उन्हाळ्याच्या या दिवसांत आईस्क्रीम, मिल्कशेक, थंडपेय यांची रेलचेल असते. पण यासोबतच अशा वातावरणात बिअर पिण्याची देखील मजा काही औरच असते! बिअर शौकीन तसे कुठल्याही वातावरणात किंवा सीजनमध्ये बिअर पितात. पण त्यातही काही जणांना उन्हाळ्यात कशी बिअर प्यायची? असा प्रश्न पडला असेल. पण तुम्हाला माहीत आहे का? बिअर ही थंड आहे. कारण बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण इतर हार्ड ड्रिंकपेक्षा कमी असतं. शिवाय बिअरमुळे शरीरातील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे उन्हाळ्यात बिअरचा अधिक खप होतो. त्यात जर बिअर ही क्राफ्ट केलेली असेल, तर अजूनच चांगलं. क्राफ्ट बिअर म्हणजे जिथे कमी प्रमाणात पण दर्जेदार, चविष्ट आणि विशिष्ट पद्धतीची बिअर तयार करण्यात येते.उन्हाळ्याच्या वातावरणात तुम्हाला देखील थंडगार बिअरचा आस्वाद घ्यायचा आहे का? मग आम्ही तुम्हाला अशीच काही ठिकाणं सांगणार आहोत, जिथे तुम्ही बिअरचा आनंद घेऊ शकता.


1) ब्रुबॉट

तुम्ही मँगोचे चाहते आहात का? मग तुमच्यासाठी हे ठिकाण कुठल्या स्वर्गाहून कमी नाही. कारण इथं मँगो फ्लेवरची बिअर क्राफ्ट केली जाते! त्यामुळे तुम्ही इथली 'मँगो ब्लाँड' ही क्राफ्ट बिअर ट्राय करू शकता. 'स्ट्रॉबेरी सायडर' हा बिअरचा आणखी एक प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. 'स्ट्रॉबेरी सायडर' हे थोडं चवीला आंबट लागतं. याशिवाय न्यूझिलंड स्टाईल पील्झनर बिअर देखील तुम्हाला इथं ट्राय करता येईल.वेळ - संध्याकाळी ४ आणि रात्री १ वाजेपर्यंत
कुठे - ब्रुबॉट, अंधेरी (प.)
नंबर - ४००३४४४८


2) गेट वे टॅपरूम

इथली बिअर जव आणि गहू यांच्यापासून तयार केली जाते. याशिवाय कॅलिफॉर्निकेशनची खासियत म्हणजे पेरू, सफरचंद आणि इतर फळांपासून इथं बिअर तयार केली जाते. तुम्ही इथली 'व्हे'लेनसिया ऑरेंज' ही बिअर ट्राय करू शकता. या बिअरमध्ये वापरण्यात येणारे ऑरेंज हे खास कॅलिफोर्नियातल्या व्हेलेनसिया इथून मागवण्यात येतात.वेळ – दुपारी १२ ते रात्री १.३० वाजेपर्यंत
कुठे - गेट वे टॅपरूम, गोडरेज बीकेसी, जी. ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पू.)


3) ड्रिफिटर्स ब्रुईंग कंपनी

बीअर प्रेमींसांठी 'ड्रिफिटर्स ब्रुईंग' कंपनी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. ड्रिफिटर्स ब्रुईंग कंपनी एक नाही तर तीन प्रकारच्या बिअर्स घेऊन येत आहे. २५ एप्रिलला या नवीन बिअर लाँच करण्यात येणार आहेत. इर्स्टन युरोपियन ब्रुससाठी ड्रिफिटर्स ब्रुईंग कंपनी प्रसिद्ध आहे. शिवाय इथं तुम्ही आयपीएलच्या मॅचचा मोठ्या स्क्रिनवर आनंद घेऊ शकता.तुम्हाला इथं मिल्की स्टाऊट, हॅफवायजन, पेल एल, पील्सनर, बेल्जियम वीट, अॅपल सायडर अशा बिअर तुम्ही ट्राय करू शकता. इटली, तुर्की, स्पेन, ग्रीस, इजिप्त इथल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद देखील तुम्ही घेऊ शकता.

कुठे - ड्रिफिटर्स ब्रुईंग कंपनी, ट्रेड व्ह्यू बिल्डींग, ऑसिस सिटी, लोअर परेल


४) द स्टड्स

'द स्टड्स' एक स्पोर्टबार आहे. बार तर्फे अनेक इव्हेंट्स अरेंज केले जातात. आयपीएल मॅचेस सुरू आहेत. तुम्हाला जर मॅच पाहात बिअरचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या स्पोर्ट्स बारला भेट देऊ शकता. यासोबतच ९९९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉकटेल्सचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता. इथं स्पिन द व्हील आणि व्हीन फ्री बिअर अशा वेगवेगळ्या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकता.कुठे - द स्टड्स, हॉटेल हॉरीजन, जुहू तारा रोड, जुहू


५) फ्लीप अॅट एमटीव्ही

'फ्लीप अॅट एमटीव्ही' इथं देखील तुम्ही बिअरसोबत मॅचचा आनंद घेऊ शकता. इथं मॅचच्या आधी तुम्ही बेट लावू शकता. जर बेट तुम्ही जिंकलात, तर तुम्हाला संपूर्ण बिलावर ५० टक्के सूट मिळेल. नाहीतर तुम्हाला दोनवर एक बिअर किंवा एकवर एक बिअर अशी ऑफर देण्यात येईल.कुठे - फ्लीप अॅट एमटीव्ही, कमला मिल्स कम्पाऊंड, ओएसीस कॉम्पलेक्स, लोअर परेलहेही वाचा

प्रकृतीसाठी बीअरचे फायदे


संबंधित विषय