Advertisement

प्रकृतीसाठी बीअरचे फायदे


प्रकृतीसाठी बीअरचे फायदे
SHARES

अल्कोहोलिक पेयांमध्ये बिअरचे सर्वाधिक सेवन केले जाते. बीअर हे जगातील सर्वात जुने मद्य आहे. यात अल्कोहोलची मात्रा इतर प्रकारच्या मद्यांपेक्षा कमी असते. बीअर ही मादक असली, तरी ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

सौजन्य

लंडनमधल्या अथेन्स हरोकोपिओ विद्यापीठात २० ते ३० वयाच्या १७ तरुणांवर यासंदर्भात प्रयोग करण्यात आले. त्यांना ४०० मिली बीअर प्यायला दिली. तास-दोन तासांनी त्यांची तपासणी करण्यात आली. यात बीअर प्यायल्याने रक्तवाहिनी आणि धमन्यांमधील रक्ताभिसरण सुधारल्याने हृदयाची ताकद वाढल्याचे निदर्शनास आले. पण बीअरचे सेवन अधिक असू नये. कारण बीअरचे प्रमाण वाढले, तर त्याचे फायदे कमी होतात, असेही या संशोधनात निदर्शनास आले आहे.

सौजन्य

सर्व पेयांमध्ये बीअर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर पाणी, दुसऱ्या क्रमांकावर चहा आणि तिसऱ्या क्रमांकावर बीअर प्रसिद्ध आहे. मुंबईतही आता ब्रुअरी ही संकल्पना हळूहळू रुजू होत आहे. बार्किंग डिअर, इंडिपेंडंट्स ब्रुइंग कंपनी, ब्रिटिश ब्रुइंग कंपनी, ब्रुबोट, डुलाली ब्रुअरी सुरू झाल्या आहेत. दर्जेदार आणि विशिष्ट पद्धतीने बीअर तयार करण्याची पद्धत म्हणजे ब्रुअरी किंवा क्राफ्ट बीअर.

सौजन्य

बीअर बनवण्यासाठी चार आवश्यक घटक


पाणी

बीअरमध्ये ९० टक्के पाणी असते. बीअर तयार करण्यासाठी मिनरल वॉटर म्हणजे झऱ्याचे किंवा नदीच्या उगमाचे पाणी असावे लागते. या पाण्यात दगडांमधील रासायनिक घटक म्हणजेच क्षार मिसळलेले असतात. ते क्षार फार महत्त्वाचे असतात. हल्ली केमिस्ट लॅबोरेटरीत जिप्सम किंवा एप्सम क्षार मिसळून नैसर्गिक चव आणली जाते.


सातू / जव (मॉल्टेड बार्ली )

बीअर बनवण्याची प्रक्रिया सुरू होते ती आंबवलेल्या माल्टपासून. माल्ट हा गहू, सातू, मका आणि तांदूळ यापासून बनवला जातो. आधीसातू या धान्याला हलके मोड येऊ दिले जातात. त्यानंतर ३० तास ते भट्टीत भाजले जातात. माल्ट दळून ते गरम पाण्यात लापशीसारखे शिजवले जाते. थोडावेळ ठेवून त्यातील साखरेचा अर्क काढला जातो.

सौजन्य

हॉप्स

हॉप्स ही वेलीवर वाढणारी एक प्रकारची फुले आहेत. बीअरला खराब करणारे जीवाणू मारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. बीअरला या फुलांमुळेच कडवटपणा, स्वाद आणि गंध येतो. हॉप्सच्या एकूण ५० प्रजातींचं व्यवसायिकरित्या उत्पादन घेतलं जातं. हॉप्सच्या प्रजातींवरच बीअरचा स्वाद अवलंबून असतो.


यीस्ट

यीस्ट हा बीअरमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. माल्ट बार्लीला आंबवताना त्यातल्या शर्करेला अल्कोहोल आणि कार्बनडाय ऑक्साईडमध्ये रूपांतरीत करतो.


बीअरचे फायदे

संतुलित प्रमाणात बीअरचे सेवन केल्याने हृदय रोग होण्याची शक्यता ४०-४५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते

बीअरच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

बीअरमध्ये असणारे हेट्रोसाइकिलिक अमीन्स तत्व कर्करोगाला कारणीभूत ठरणारे जिवाणू नष्ट करते

संतुलित प्रमाणात बीअरचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या कमी होते

बीअरमध्ये पाणी अधिक असते. त्यामुळे ते किडनीसाठी फायदेशीर आहे


सौजन्य

बीअरमध्ये फायबर असल्याने पचनशक्ती सुधारते

बीअरमधील लॅक्टोफ्लेविन आणि निकोटिनिक अॅसिड अनिद्रेच्या समस्येवर फायदेशीर आहे



हेही वाचा

आता बर्फाचाच नाही, बियरचाही गोळा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा