आता मुंबईत मॅक्सिकन मॅजिक

एखादा पदार्थ बाहेरच्या देशातील असेल तर तो आपल्याला कितपत आवडेल याबाबत शंकाच असते. पण आपली टेस्ट ओळखून त्या पदार्थात काही बदल केल्यास तो पदार्थ निश्चितच आपल्या पसंतीस उतरतो. इंडियन फूडची टेस्ट लक्षात घेऊन पदार्थांमध्ये काही ठराविक बदल केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. हाच धागा पकडून 'न्यूयॉर्क बरीटो कंपनी'नं त्यांचं पहिलं आऊटलेट मुंबईत सुरू केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना मॅक्सिकन पदार्थांची चव चाखता येणार आहे. व्हेजीटेरीयन खाणाऱ्यांसाठी तर हा स्वर्गच आहे. कारण इथं १०० टक्के व्हेजीटेरीयन पदार्थांचाच आस्वाद घेता येणार आहे.

न्यूयॉर्क बरीटो कंपनी काय आहे?

'न्यूयॉर्क बरीटो कंपनी'नं 'बरीटो' आणि 'बरीटो बोल' हे नवीन मॅक्सिकन पदार्थ लाँच केली आहेत. शेफ डेलिओ अर्मिन पुरेतो सबेलॉस यांनी हे दोन हटके पदार्थ आणलेत. शेफ डेलिओ मॅक्सिकोमध्येच लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मेन्यूमध्ये बरीटो, बरीटो बॉल्स, सलाड्स, पिज्जा, कैसेडियाज अशा मॅक्सिकन डिशेस पाहायला मिळतात.

तुम्ही एकदा तरी इथला पदार्थांचा आस्वाद घ्या. विशेष म्हणजे तुम्ही इथला गोकोमोली हा पदार्थ ट्राय करा. गोकोमोली तुम्ही नाचोस सोबत डिप करून खाऊ शकता. गोकोमोली अॅवकाडोपासून बनवण्यात येतं. इथं तुम्हाला प्रत्येक मिलसोबत गोकोमोली देण्यात येतं.

'बरीटो बॉल्स'मध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन पर्याय देण्यात येतात. बरीटो बॉल्समध्ये काय काय समाविष्ट करायचं, हा देखील पर्याय तुम्हाला मिळतो. बरीटो बॉल्समध्ये व्हाईट राईस (जॅन) आणि ब्राऊन राईस (नॉन-जॅन) राईसमध्ये हे दोन पर्याय मिळतात. यासोबतच तुम्हाला पनीर, मशरूम, सोयाबीन, बटाटा यातलं जे काही राईसमध्ये अॅड करायचं आहे ते तुम्ही करू शकता. एकूणच तुम्ही तुमचा कस्टमाईज बाॅल तयार करू शकता. तुम्हाला इथं इंडियन आणि मॅक्सिकन अशा फ्युजनची चव चाखता येते.

न्यूयॉर्क बरीटोची खासियत

बरीटो ही त्यांची सिगनिचर डिश आहे. यामध्ये १८ इनग्रीडिअन्सचा अॅड केलेले आहेत. ट्रॉरटियाज, कॉर्न, फ्लार हे इनग्रीडिअन्स भारतातच बनवले जातात. ट्रॉरटियाज आणि सॉस हे इनहाऊस बनवले जातात. इथं सर्व पदार्थ इको फ्रेंडली कटलेरीतून सर्व्ह केले जातात. हे कटलेरी  जेकी बांबूपासून तयार केले जातात.

संकल्पना कोणाची?

सेनिल शहा आणि विंगलिच रिबॅलो या दोघांनी एकत्र येत न्यूयॉर्क बरीटो कंपनी हे मॅक्सिकन रेस्टॉरंट सुरू केलं. इंडियन आणि मॅक्सिकन फूड्सच हे फ्युजन मुंबईकरांना उपलब्ध करून देणं पूर्वीपासूनच दोघांचं स्वप्न होतं. अखेर हे स्वप्न दोघांनी पूर्ण केलं. येत्या वर्षभरात हा व्यवसाय वाढवण्याचा त्यांचा विचार आहे.

तुम्हालासुद्धा मॅक्सिकन खाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर या रेस्टॉरंटला एकदा तरी भेट द्या. ते तुमचा अपेक्षा भंग करणार नाहीत याची खात्री आहे.


हेही वाचा-

मग येणार का 'नौ से बारा'?


पुढील बातमी
इतर बातम्या