Advertisement

मग येणार का 'नौ से बारा'?

बॉलिवूड आणि खाण्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीय काहीही करू शकतात. याचाच प्रत्यय बॉलिवूड थीमवर आधारित 'नौ से बारा' या रेस्टॉरंटमध्ये येतो. बॉलिवूड चित्रपट प्रेमींसाठी तर जणू हा एक स्वर्गच आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन वेगवेगळ्या माध्यमांना या रेस्टॉरंटनं एकत्र आणलं आहे.

मग येणार का 'नौ से बारा'?
SHARES

भिंतीवर लावलेले बॉलिवूड स्टार्सचे पोस्टर, डॉन, हेरा-फेरी अशा बॉलिवूड चित्रपटांचे आणि द हॉर्स फ्रॉम ट्रॉय, द सिंकिंग शिप, द ऑक्टोपस अशा हॉलिवूड चित्रपटांचे बॅनर्स...चित्रपटांचे फेमस डायलॉग्स...तर कुठे बसलेले अमिताभ बच्चन कुठे रजनिकांत तर कुठे शाहरुख खान...फक्त एवढंच नाही, तर कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅनसुद्धा...वाचून तरी तुम्हाला एखाद्या रिअॅलिटी शोचा सेट असल्याचा भास होत असेल. पण हा कुठल्या शोचा सेट नाही, तर बॉलिवूड थीमवर आधारित रेस्टॉरंट आहे. 'नौ से बारा' असं या रेस्टॉरंटचं नाव आहे.'नौ से बारा'ची खासियत

बॉलिवूड स्टार्सवर भारतीय अक्षरश: जीव ओवाळून टाकतात. काही रसिकांनी तर आपल्या लाडक्या स्टार्सना देवाचा दर्जा दिला आहे. यासोबतच भारतीय खाण्याचेही शौकिन आहेत. स्वादिस्ट आणि हटके पदार्थ खाण्यासाठी भारतीय नेहमीच तयार असतात. त्यामुळे बॉलिवूड आणि खाण्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीय काहीही करू शकतात. याचाच प्रत्यय बॉलिवूड थीमवर आधारित 'नौ से बारा' या रेस्टॉरंटमध्ये येतो. बॉलिवूड चित्रपट प्रेमींसाठी तर जणू हा एक स्वर्गच आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन वेगवेगळ्या माध्यमांना या रेस्टॉरंटनं एकत्र आणलं आहे.बॉलिवूड थीमवर आधारित असल्यानं तुम्हाला इथं अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान आणि इतर कलाकारांचे फोटो दिसतील. एका ३डी बॉक्सवर चित्रपटांचे पोस्टर पाहायला मिळतात. 'बाप का, दादा का, सबका बदला लेगा रे फैजल' हा गँग ऑफ वासिपूर चित्रपटातील फेमस डायलॉग आणि असे अनेक फेमस डायलॉग इथलं आकर्षण आहेत.रेस्टॉरंटच्या बार काऊंटरवर मोठ्या अक्षरांमध्ये 'चलती है क्या नौ से बारा' असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे एक वेगळाच फील येतो. याशिवाय तुम्हाला इथल्या अलार्म क्लॉक, कुशन्स आणि चहाचा मग हे सर्व बॉलिवूडच्या आठवणींसाठी समर्पित केले आहेत. तुम्हाला इथल्या भिंतींवर फोटो फ्रेममध्ये कॅमेरे देखील पाहायला मिळतील.हेही वाचा : फक्त बटाटा नाही, आता चिकन वडापाव सुद्धा!खाण्यामध्ये वेगळेपणा

कॉन्टिनेन्टल आणि इटॅलियन अशा कॉम्बोमध्ये इथल्या डिशेस असणार आहेत. तसेच इथले सँडव्हिच, बर्गर हे देखील तुमच्या खाण्याची रंगत वाढवेल. इथल्या पदार्थांना बॉलिवूड चित्रपटांची, गाण्यांची नाव देण्यात आली आहेत. पालक आणि चीझचं कॉम्बिनेशन असलेले फिंगर्स, गोलमाल अनिअन रिंग , द रंगीला मेज प्लेटर, फ्लाईंग जट चिकन विंग्स आणि फैरी चिकन विंग्स असे पदार्थ इथली खासियत आहेत. सामने ये कॉर्न आया, पुल्ड चिकन टिक्का बर्गर अशी इथल्या बर्गर्सची नावं आहेत.'नौ से बारा' या रेस्टॉरंटमध्ये कॉकटेल्स देखील एका वेगळ्या पद्धतीनं सर्व्ह केले जातात. 'द बॉलिवूड खाला खट्टा' तुम्ही नक्की ट्राय करा. यात बर्फाचा गोळा हा मसाला आणि वोडकामध्ये डिप करून दिला जातो. 'रंगीला' नावाचा प्रकार तुम्हाला लाहनपणीची आठवण करून देईल. यात वेगवेगळ्या फ्लेवर्सचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. याशिवाय 'शराबी चहा' हे हटके ड्रिंक तुम्ही नक्की ट्राय करा. मसाला चाय आणि व्हिस्की हे विचित्र कॉम्बिनेशन शराबी चहामध्ये आहे.तुम्ही बॉलिवूड चित्रपटांचे किंवा स्टार्सचे चाहते असाल तर नक्की नौ से बारा या रेस्टॉरंटला भेट द्या.


कुठे?

ग्राऊंड फ्लोअर, बालाजी मूव्हीप्लेक्स, सेक्टर ८, कोपर खैरणे, नवी मुंबईहेही वाचा

फ्ली बाजार कॅफे...खाण्याचं एक भन्नाट ठिकाण!


संबंधित विषय
Advertisement